घरलाईफस्टाईलचिरतरुण दिसण्यासाठी करा या पदार्थांचे सेवन

चिरतरुण दिसण्यासाठी करा या पदार्थांचे सेवन

Subscribe

वय वाढल्यानंतर चेहर्‍यावर दिसणार्‍या सुरकुत्या कुणालाच नको असतात. त्यासाठी अनेक उपाय केले जातात. कुणी महागडी कॉस्मेटिक्स वापरतात, तर कुणी सतत पार्लर ट्रिटमेंट करतात. सिनेतारका तर यासाठी वेगवेगळ्या सर्जरी सुध्दा करतात. या सर्व गोष्टींसाठी खर्चही खूप होतो, त्यामुळे सर्वांनाच ते परवडण्यासारखे नसते. काही गोष्टींचा आहारात समावेश केला तर तुमच्या चेहर्‍यावरील वाढत्या वयाच्या खुणा नक्कीच कमी दिसतील आणि तुम्ही आहे त्या वयापेक्षा नक्कीच वयाने लहान दिसाल.

चला तर मग जाणून घेऊया चिरतरुण दिसण्यास मदत करणार्‍या पदार्थांविषयी.

दही – तुमच्या आहारात नियमित दह्याचे सेवन करा. प्रत्येकाच्या घरात दही असतंच. दह्याच्या सेवनानं अनेक गुणकारी फायदे आपल्या शरीराला होतात. यामध्ये चांगले बॅक्टेरिया शरीरासाठी तसेच त्वचेसाठी अत्यंत उपयोगी आहे.

कलिंगड – कलिंगडामध्ये लायकोपेन असते, ज्यामुळे त्वचा तजेलदार होते. तसेच युव्ही किरणांपासून त्वचेचे रक्षण करण्याचे कामही कलिंगडातील लायकोपेन करते.

- Advertisement -

काकडी – रोजच्या आहारात काकडीचा समावेश केल्यास त्वचेचा तजेलपणा टिकून राहतो. काकडीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी असते जे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते.

अ‍ॅव्होकॅडो – ओमेगा ९ फॅटी अ‍ॅसिडचा मोठा स्त्रोत म्हणजे अ‍ॅव्होकॅडो फळ. त्वचेतील ओलावा कायम राखण्यासाठी, त्वचा मुलायम बनवण्यासाठी याचा खूप फायदा होतो. त्यामुळे आहारात अ‍ॅव्होकॅडो फळाचा नक्की समावेश करा.

- Advertisement -

डाळिंब- डाळिंबामुळे डीएनएचं वय वाढण्याची प्रक्रिया धिम्या गतीने होते. स्पेनच्या प्रोबेल्टबायो लॅबोरेटरीच्या अभ्यासकांनी केलेल्या संशोधनात डाळींब खाणार्‍या व्यक्तींच्या त्वचेवर वयाचा होणारा परिणाम कमी दिसून आला. डाळिंब नियमित सेवन केल्यास डीएनए ऑक्सिडेशनची प्रक्रिया मंदगतीने होते हे या अभ्यासावरून स्पष्ट झाले. डाळिंब प्रौढावस्थेतील समस्या दूर करते आणि कामाच्या वेळी येणार्‍या तणावातही लाभदायक ठरते, असे ब्रिटनच्या क्वीन मार्गारेट विश्व विद्यालयाच्या एका संशोधन विभागालाही आढळले. त्यामुळे चिरतरुण दिसायचे असेल तर डाळिंबाचा आहारात हमखास समावेश करायला विसरू नका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -