घरलाईफस्टाईलचपात्या खाणाऱ्यांनो सावधान, होऊ शकतो आरोग्यावर दुष्परिणाम

चपात्या खाणाऱ्यांनो सावधान, होऊ शकतो आरोग्यावर दुष्परिणाम

Subscribe

पाती खाल्ल्याने आपली पचनशक्ती दुरुस्त होते. मात्र चपातीचे अतिसेवन केल्यास त्याचा आपल्या शरीरावर दुष्परिणामही होऊ शकतो.

चपाती हा आपल्या आहाराचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. चपाती शिवाय आपले जेवण हे अर्धवट असते. काही लोक चपातीला पर्याय म्हणून तांदळाची भाकरीही खातात. चपात्यांमध्ये असलेले पोषक घटक आपल्या शरीराला तंदुरुस्त बनवण्यासाठी मोठी मदत करतात. चपातीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम आणि प्रोटीन असते ज्यामुळे आपली हाडे मजबुत राहण्यास मदत होते. चपाती खाण्यासाठी खूप हलकी असते. चपाती खाल्ल्याने आपली पचनशक्ती दुरुस्त होते. मात्र चपातीचे अतिसेवन केल्यास त्याचा आपल्या शरीरावर दुष्परिणामही होऊ शकतो.

कार्बोहायड्रेटचे प्रमाण वाढते

ज्या लोकांच्या शरीरामध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते. त्यांनी चपातीचे सेवन कमी करायला पाहिजे. ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असलेल्याना चपातीचे सेवन केल्यास त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

- Advertisement -

पचन शक्ती बिघडते

जास्त प्रमाणात चपाती खाल्ल्याने आपली पचन शक्ती बिघडू शकते. ज्यांची पचन शक्ती चांगली आहे त्यांना याचा काही त्रास होणार नाही. मात्र ज्यांची पचनशक्ती चांगली नाही त्यांनी जास्त प्रमाणात चपात्यांचे सेवन करू नये. जास्त चपात्या खाल्ल्याने फुड पॉइजन होण्याचा धोका आहे.

फॅट्स वाढणे

शरीरातील कार्बोहायड्रेटचे प्रमाण वाढल्यास शरीरातील फॅट्स वाढतात. फॅट्स वाढल्याने तुमचे वजनही वाढायला सुरुवात होते. जर नियमितपणे व्यायाम करत असाल तर त्याचा तुमच्या शरीरावर काही परिणाम होणार नाही.

- Advertisement -

हेही वाचा – जेवणात मीठ, मसाला जास्त झालायं! ‘हे’ उपाय करा

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -