घरलाईफस्टाईलभूक नसताना खाताय? होऊ शकते Acidity!

भूक नसताना खाताय? होऊ शकते Acidity!

Subscribe

बऱ्याचदा काय होतो एखादा पदार्थ आवडत नसल्यास ते खाणे टाळले जाते. तर दुसरीकडे एखादा पदार्थ आवडतो म्हणून त्याचे अधिक सेवन केले जाते. पण, हे धोकादायक ठरु शकते. तसेच भूक नसताना खाल्ल्यास Acidityचा त्रास होऊ शकतो.

पित्त हा घटक मानवी शरीरासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. पण, सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात दलती जीवनशैली, जेवणाच्या अनियमित वेळा, अपुरी झोपं, बदललेले आहाराचे स्वरूप यामुळे अपचन किंवा Acidityचा त्रास होणे हा अनेकांच्या दिनक्रमाचाच भाग बनला आहे.

- Advertisement -

तसेच जठरात प्रमाणापेक्षा जास्त आंबट द्रव तयार होणे. हे आम्ल अन्न पचनासाठी अत्यंत आवश्यक असते. परंतु, त्याच्या अति जास्त प्रमाणामुळे आम्लपित्त अथवा Acidityचा त्रास सुरू होऊ शकतो.

पित्ताचा त्रास टाळण्यासाठी उपाययोजना

⦁ भूक नसल्यास विनाकारण खाणं टाळा
⦁ आहारात ताजी फळे, भाज्या आणि अन्नधान्याचा समावेश करा
⦁ भरपूर पाणी प्या
⦁ सोयाबीन, डाळी अशा फायबरयुक्त पदार्थ खा
⦁ कंटाळवाणेपणा किंवा एकाकीपणामुळे खाणे टाळा
⦁ जंकफुड किंवा उघड्यावरील मसालेदार पदार्थांचे सेवन टाळावेत
⦁ नियमित व्यायाम करा
⦁ आपल्या जेवणात निरोगी घटकांचा समावेश असल्याचे सुनिश्चित करा.
⦁ खाल्ल्यानंतर लगेचच अंथरूणात झोपणं टाळा
⦁ मद्यपान आणि धूम्रपान यांसारख्या व्यसनापासून दूर रहा
⦁ कांद्याचा रस किंवा टोमॅटोचा रस पिऊ नका किंवा कच्चा कांदा देखील खाऊ नका.
⦁ जेवणाच्या वेळा निश्चित करा, रात्रीअपरात्री खाण्याची सवय टाळा

- Advertisement -

उद्भवू शकतात समस्या

Acidityटीचे वेळीच निदान न झाल्यास एक ना अनेक समस्या उद्भवू शकतात.

⦁ अन्ननलिकेला सूज येणे
⦁ अन्ननलिकेच्या भिंतीवर जखमा, अल्सर, अन्ननलिकेचे तोंड आकुंचन पावणे.
⦁ अन्ननलिकेचा कॅन्सर.
⦁ रक्तक्षय

या कारणास्तव अपचन किंवा Acidityचा त्रास होत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार घेणं आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -