झटपट ‘एगलेस पॅनकेक’

झटपट 'एगलेस पॅनकेक' रेसिपी

Mumbai
eggless pancakes recipe at home
झटपट 'एगलेस पॅनकेक'

केक बनवायचे म्हटले की त्याकरता असंख्य साहित्य लागते. तसेच केकचे भांडे देखील लागते. मात्र, आज आम्ही तुम्हाला झटपट एगलेस पॅन केक कसा बनवायचा याची रेसिपी सांगणार आहोत. हा केक खाण्यासाठी देखील तितकाच चविष्ट लागतो.

साहित्य

२ वाटी मैदा किंवा गव्हाचे पीठ
३ चमचे पिठीसाखर
१ चमचा बेकिँग पावडर
अर्धा चमचा बेकिँग सोडा
३ चमचे तूप
१ ते दिड वाटी दूध
१ चमचा व्हेनिला इसेन्स

कृती

सर्वप्रमथ मैदा, पिठीसाखर, बेकिँग पावडर, बेकिँग सोडा, व्हेनिला इसेन्स, तुप हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करुन घ्यावे. त्यानंतर यामध्ये थोडे-थोडे दुध घालून मिश्रण थोडे सैलसर करावे. हे मिश्रण थोडेसे जाडसर इडलीच्या मिश्रणाप्रमाणे तयार करुन घ्यावे. नंतर हे मिश्रण पाच मिनिटासाठी झाकून ठेवावे. त्यानंतर नॉनस्टीक पॅन वरती थोडेसे तुप लावून घ्यावे आणि त्यावर पळीने थोडे-थोडेसे मिश्रण घालावे. एका बाजुने भाजून दुसऱ्या बाजूनेही लालसर भाजून घ्यावे. अशाप्रकारे झटपट एगलेस पॅन केक खाण्यासाठी देखील चविष्ट लागतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here