घरलाईफस्टाईलआरोग्यास लाभदायी एकपाद उत्तानासन

आरोग्यास लाभदायी एकपाद उत्तानासन

Subscribe

या आसनामुळे बद्धकोष्ठता, अपचन, वातविकार तसंच आतडयातील विविध आजार दूर होण्यास मदत

अनेकांना पायांतील शिरांचे आजार, स्लिप डिस्क, गुडघेदुखी आणि कंबरेचं दुखणं या सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असते. या समस्येवर लाभदायक ठरणारे आसन म्हणजे एकपाद उत्तानासन. उत्तान म्हणजे आकाशाकडे तोंड करून झोपलेली अवस्था आणि पाद म्हणजे पाय. या आसनात आपण पाठीवर झोपून एक पाय वरच्या दिशेला ६० अंश अशा स्थितीत असतो म्हणूनच या आसनाला एकपाद उत्तानपादासन असंही म्हणतात. या आसनामुळे पोटाच्या स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो.

असे करा एकपाद उत्तानासन

- Advertisement -
  • हे आसन करण्यासाठी तुम्हाला उताणं झोपायचं आहे. हात जांघांच्या जवळ जमीनीवर ठेवा. आता हळूहळू उजवा पाय गुडघ्यातून वाकवून उभा करा. तशाच प्रकारे डाव्या पायालाही वाकवून घ्या.
  • आता उजव्या पायावर थोडा दबाव टाकून आणि कंबर जमिनीवरच ठेवून श्वास घेत घेत डावा पाय जितका वर उचलता येईल तितका उचला आणि सरळ ठेवा. इथे उजव्या पायावर गुडघ्याजवळ डाव्या पायाचा गुडघा ठेवा.
  • आता पायाचा तळवा हळूहळू पुढे-मागे करा. पुढे-मागे करताना थोडा वेळ खेचून ठेवा. हे करताना पायाच्या सगळ्या नसा खेचल्या जात असल्याचा अनुभव तुम्हाला येईल.
  • ६ ते ८ वेळा पायाचा तळवा मागे-पुढे केल्यानंतर पाय गुडघ्यातून वाकवा.

एकपाद उत्तानासन फायदे

  • या आसनामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.
  • या आसनामुळे बद्धकोष्ठता, अपचन, वातविकार तसंच आतडयातील विविध आजार दूर होण्यास मदत होते.
  • या आसनाने पायातील रक्ताभिसरण चांगल्याप्रकारे होतं. तसंच गुडघा आणि गुडघ्याखालील पाय दुखण्याच्या तक्रारी या आसनाने कमी होतात.
  • स्त्रियांच्या मासिक पाळीसंबंधीच्या तक्रारी या आसनाने कमी होतात.
  • हे आसन करताना छातीवर भरपूर दाब पडतो. त्यामुळे फुप्फुसांचे स्नायू बळकट होतात.

आसन करताना अशी घ्या काळजी

जेव्हा आपण पायाला वरती आणतो तेव्हा पाय हे सरळ आणि ताठच असावेत. जो दुसरा पाय खाली असतो तो वरती उचलला जाणार नाही याची काळजी घ्यावी. मानेला वरती उचलू नये. मान ही जमिनीलगत असावी. तसंच हातसुद्धा जमिनीवरच असावेत. पाय खाली आणताना घाई करू नये. पाय खाली आणताना मानेला वरती उचलू नये. हे आसन तसं करण्यासाठी खूप सोपं आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -