आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्या जिऱ्याचं पाणी

जाणून घ्या जिऱ्याचं पाणी का प्यावं?

Mumbai
every morning drink cumin water for good health
आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्या जिऱ्याचं पाणी

काही जणांना सकाळी उठल्या उठल्या चहा पिण्याची सवय असते. तर काहीजण आरोग्यासाठी सकाळी उठल्यावर गरम पाणी पितात. याशिवाय तुम्हाला आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर जिऱ्याचं पाणी देखील प्या.  तुम्ही जर सकाळी उठल्यानंतर जिऱ्याचं पाणी प्यायलात तर तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात. आपल्या माहित आहे की, जिरं पोटाचे विकार, गॅस, एसिडीटी यांसारख्या अनेक आजारांवर फायदेशीर ठरते. त्यामुळे आज आपण जिऱ्याचं पाणी प्यायल्याने काय फायदे होतात आणि ते का प्यावं? याबद्दल जाणून घेणार आहोत.

१) जिऱ्याचं पाणी प्यायल्याने पोटासंबंधी समस्या दूर होतात.
२) जिऱ्याच्या पाण्यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. एक चमचा जिऱ्यामध्ये ७ कॅलरी असतात.
३) नियमितपणे सकाळी उठल्यानंतर जिऱ्याचे पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक प्रमाणात कॉपर, मँगजीन, मिनरल्स मिळतात.
४) जिऱ्याचं पाणी हे वजन कमी करण्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतं.
५) तसंच हे पाणी प्यायल्याने तुम्हाला दिवसभरासाठी ऊर्जा मिळते.

असं करा जिऱ्याचं पाणी

एक चमचा जिरं एक ग्लास पाण्यात टाका आणि ते रात्रभर ठेवा. जमल्यास तांब्याच्या भांड्यात हे पाणी ठेवा. त्यानंतर सकाळी हे पाणी पिण्या अगोदर गाळून प्या.


हेही वाचा – गृहिणींसाठी खास किचन टीप्स