घरलाईफस्टाईलप्रमाणाबाहेर वजन गर्भावस्थेत घातक

प्रमाणाबाहेर वजन गर्भावस्थेत घातक

Subscribe

माता बनण्यात येणार्‍या अडचणींमध्ये प्रमाणाबाहेर वजन हेही कारण कारणीभूत ठरू शकते. जर्मन खेळ आणि आरोग्य संस्था डीजीएसपीनुसार नियमित व्यायाम आणि आहारातील बदलांमुळे गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक वाढते.

डीजीएसपी नुसार अधिक वजनामुळे गर्भावस्थेवेळी माता आणि बाळाला दोघांनाही धोका निर्माण होतो. तर वजन कमी किंवा प्रमाणात असल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता ८० टक्क्यांनी वाढते. यामुळे गर्भाला असणारा धोकाही खूप कमी होतो.

- Advertisement -

अधिक वजनामुळे महिलांमध्ये मासिक पाळीत अनियमितता असल्याचे आढळते. मुलं जन्माला घालण्याच्या क्षमतेवरही याचा वाईट परिणाम होतो. डीजीएसपी च्या उलरिके कॉर्स्टेन रेक यांच्या मते वजन कमी केल्याने केवळ दैनंदिन जीवन उत्तम होतं असं नाही तर मुलं जन्माला घालणेही सोपी प्रक्रिया होते. गर्भधारणा होण्यापूर्वी वजन नियंत्रणात असले (कमी असले) तर मूल जन्माला आल्यानंतरही वजन सर्वसाधारण रहातं.

डीजीएसपी चे उलरिके कॉर्स्टेन रेक यांच्या मते हलका-फुलका व्यायाम आणि आहाराच्या सवयी बदलल्यास खूप लाभ होतो. हे घरगुती मार्ग कुठल्याही इस्पितळात फर्टिलिटी ट्रीटमेंटपेक्षा अधिक चांगले आणि स्वस्त आहेत. गर्भवती महिलांनी खूप चालले पाहिजे. नॉर्डिक वॉकिंगसारखे व्यायाम केले पाहिजेत. याबरोबरच ३० डिग्री गरम पाण्यात पोहल्याने खूप आराम मिळू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -