घरलाईफस्टाईलघरच्या घरी करा 'फेस क्लिनअप'

घरच्या घरी करा ‘फेस क्लिनअप’

Subscribe

असा करा चेहरा स्वच्छ

सध्या तापमान वाढीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेकदा अशा वातावरणामुळे थकवा जाणवण्यास सुरुवात होते. मात्र, असे असले तरी आपला चेहरा फ्रेश आणि स्वच्छ असल्यास समोरच्याला आणि आपल्यालाही छान वाटते. बऱ्याचदा साबणाने किंवा फेस वॉशने चेहरा स्वच्छ केला जातो. मात्र, आज आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहे. त्यांने तुमचा चेहरा स्वच्छ आणि सुंदर देखील दिसण्यास मदत होईल.

  • चेहरा धुण्यासाठी तुमच्या त्वचेनुसार योग्य फेस वॉश किंवा क्लिंजर वापरा. त्यानंतर टोनर लावा आणि चेहरा शक्यतो कोमट पाण्याने धुवा.
  • चेहऱ्यावरील सुक्ष्म छिद्र बुजवण्यासाठी क्लिंजिंग मिल्क कापसाच्या बोळ्यावर घेऊन चेहरा साफ करुन घ्या.
    नंतर चेहऱ्याला सोसवेल इतकी वाफ घ्या.
  • चेहऱ्याला वाफ दिल्यानंतर थंड करण्यासाठी बर्फाने मसाज करा. हा मसाज गोलाकार दिशेने करा.
  • तुमच्या त्वचेनुसार योग्य फेस स्क्रबर निवडा. फेस स्क्रबरने ८-१० मिनिटे चेहरा साफ करा.
  • स्क्रबर चेहऱ्यावर थोडा सुकल्यानंतर चेहऱ्याला मध लावा. मधामुळे ब्रेकआउट्सचे प्रमाण कमी होते आणि त्वचा उजळते.
  • नंतर चेहरा स्वच्छ धुऊन आवडीनुसार फेस पॅक लावा. फेस पॅक पूर्ण सुकल्यावर चेहरा धुऊन टाका.
  • हळूहळू चेहरा सुकू द्या. त्यानंतर टोनर लावा. चेहऱ्याला तजेला येण्यासाठी मॉइश्चरायजर लावा आणि मग तुमचा चेहरा पहा अगदी गोरा दिसेल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -