घरलाईफस्टाईलफॅशन फॅन्सी फ्रिल्सची

फॅशन फॅन्सी फ्रिल्सची

Subscribe

फ्रिलचे फ्रॉक म्हटले की डोळ्यांसमोर फ्रिलच्या फ्रॉकमधील लहान लहान मुलींचे चित्र दिसते. हे फ्रॉक परिधान केल्यामुळे लहान मुली एकप्रकारे राजकन्या किंवा परी सारख्या दिसतात.त्यामुळे त्यांचा गोंडसपणा आणखी उठून दिसतो. फ्रिलचे फ्रॉक तर अजूनही लहानमुलांमध्ये चालतात. कितीही जुनी फॅशन असली तरी फ्रिलचे फ्रॉक हे कायम फॅशनमध्ये टिकून आहे. फ्रिलचे फ्रॉक घातल्यामुळे लहान मुले अजूनच गोंडस दिसतात.

फॅशन ही अशी गोष्ट आहे ती, केव्हा कुठल्या प्रकारची आणि कशाची फॅशन येईल हे सांगता येत नाही.
सध्या मार्केटमध्ये फ्रिल असलेल्या थ्री-फोर्थ टॉप्सची फॅशन दिसत आहे. या फ्रिल्समुळे तुमच्या टॉप्सचा वेगळेपणा उठून दिसतो.

पुर्वी असे फ्रॉक हे समारंभानुसार वापरले जायचे. सध्या तर फ्रिलचे टॉप मुली कॉर्पोरेट सूटसोबत घालणे पसंत करतात. कारण बोअरिंग दिसणारे फॉर्मल सूट फ्रिलच्या टॉपमुळे नवीन लुकमध्ये दिसतात.

- Advertisement -

फ्रिलच्या ड्रेसची सर्वात मोठी वैशिष्टे म्हणजे हे फेमिनाइन लुक देतात आणि तुम्ही याला पार्टी वेअर ते कॅज्युअल वेअरपर्यंत घालू शकता. या प्रकारचे रफल्ड ड्रेस तुम्ही बर्‍याच डिझायनमध्ये तयार करू शकता. जसे रफल्ड रँप ड्रेस, सिंगल लेअर रफल्ड ड्रेस, टीर्ड रफल्ड ड्रेस.

रफल्ड ड्रेस स्टायलिश लुक तर देतातच त्याशिवाय तुमच्या बर्‍याच समस्यांचे निदान देखील करतात. जसे तुमची बस्ट लाइन स्मॉल असेल तर अशा ड्रेसची निवड करा ज्यात फ्रिल वरच्या बाजूस दिली असेल आणि जर बस्ट लाइन हेवी असेल तर तुमच्यासाठी अशा प्रकारचा ड्रेस योग्य राहील ज्यात फ्रिल व्हर्टीकली स्ट्रेट लाइनमध्ये असेल. जर तुम्ही बॉडीच्या खालील भागाला हेवी लुक देण्याचा प्रयत्न करत असाल तर खालच्या बाजूला फ्रिल असलेले परिधान उपयुक्त ठरतील. बॉलीवूडच्या अभिनेत्री देखील फ्रिलने सजलेले ड्रेस परिधानात दिसतात. फिल्म फेस्टिव्हलसारख्या समारंभात दीपिका पादुकोन, अनुष्का शर्मा, प्रियंका चोप्रा, सोनाक्षी अभिनेत्री सिन्हा फ्रिलच्या ड्रेसला प्राधान्य देतात.

- Advertisement -

फ्रिलच्या ड्रेसमध्ये तुम्हाला ज्वेलरीची चिंता करण्याची गरज नसते. कशाही प्रकारच्या ज्वेलरीवर हे चांगले लुक देतात. फ्रिलदार ड्रेसला तुम्ही बर्‍याच डिझायन आणि मटेरियलमध्ये तयार करू शकता. हे हलके कपडे जसे जॉर्जेट, शिफॉन, कॉटन आणि सॅटिनमध्ये जास्त चांगले लुक देतात. तर मग आता पुढच्या पार्टीसाठी वेगळे दिसून येण्यासाठी एखादा फ्रिलचा ड्रेस स्वतःसाठी नक्कीच तयार करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -