उपवासाचे घावन

उपवासाचे घावन रेसिपी

Mumbai
fast special recipe fasting ghavan
उपवासाचे घावन

आठवड्यामध्ये बऱ्याच मंडळींचा एक दिवसाचा तरी उपवास असतो. मात्र, दर आठवड्याला उपवासाकरता काय करावे, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यांच्याकरता खास अशी चविष्ट उपवासाची रेसिपी घेऊन आलो आहोत ती म्हणजे ‘उपवासाचे घावन’

साहित्य

१ वाटी वरी तांदूळ
१ वाटी साबुदाणे
२ हिरव्या मिरच्या
२ चमचे नारळाचा चव
२ चमचे दाण्याचे कूट
१ चमचा जिरे
चवीपुरते मिठ
साजूक तूप

कृती

साबुदाणा आणि वरीतांदूळ एकत्र भिजवावे. पाण्याची पातळी साबुदाणा आणि वरीतांदूळ बुडून वरती २ इंच एवढी असावी. अशाप्रकारे दोन्ही ४-५ तास भिजवावे. दोन्ही व्यवस्थित भिजल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. वाटतानाच त्यात मिरची, जिरे, खोबरे, दाण्याचा कूट, मीठ घालावे. आपण नेहमीच्या घावनाला जेवढे घट्ट भिजवतो तेवढेच घट्ट भिजवावे. म्हणजे त्या अंदाजाने मिक्सरमध्ये पाणी घालावे. नॉनस्टीक तव्याला तूप लावून घ्यावे. एक डाव मिश्रण पातळसर पसरवावे. कडेने एक चमचा तूप सोडावे. एक वाफ काढावी. एक बाजू शिजली कि दुसरी बाजू नीट होवू द्यावी. गरम गरम घावन नारळाच्या चटणी सर्व्ह करावे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here