रुचकर ‘केळीचा रायता’

झटपट केळीचा रायता

Mumbai
banana-raita-recipe
fasting banana raita recipe

सध्या श्रावण महिना सुरु आहे. या महिन्यात बऱ्याच जणांचे उपवास असतात. कोणी शनिवारी उपवास करतं तर कोणी सोमवारीमात्र, सतत साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी वेगळे खावेसे वाटते. अगदी झटपट आणि चविष्ट पदार्थ आपण बनवु शकतो. चला तर मग पाहुया अशीच एक रुचकर उपवासाची रेसिपी

साहित्य

. पिकलेली केळी:
. वाळलेले बारीक खोबरे: /२ कप
. लिंबू :
. वेनिला किंवा साधे दही: १ कप
. बारीक कापलेले बदाम: १ टेबल स्पून

कृती

सर्वप्रथम वाळलेले बारीक खोबरे कोरडे तांबुस होईपर्यंत भाजा. त्यानंतर केळ्यांचे तुमच्या आवडीनुसार काप करा. त्या कापांना लिंबाचा रस चांगला लावा म्हणजे केळी काळी पडणार नाहीत. त्या कापांमधे दही, खोबरे आणि बदाम टाकून चांगले एकत्र करा. अशाप्रकारे झटपट आणि रुचकर उपवासाचा रायता तुम्ही गार करून किंवा तसाच खाऊ शकता. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यात थोडी साखर देखील घालू शकता. तसेच हा रायता तुम्ही साइड डिश म्हणून किंवा स्नॅक म्हणूनही खाऊ शकता.