उपवासाची ‘कचोरी’

उपवासाची 'कचोरी' रेसिपी

Mumbai
Fasting kachori recipe at home
उपवासाची 'कचोरी' रेसिपी

अनेकदा उपवासाला काय खाव, असा प्रश्न पडतो. तसेच सततची साबुदाणा खिचडी आणि उपवासाची बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी खमंग, चटकदार खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही उपवासाची कचोरी नक्की ट्राय करा. ही तयार करण्यास ही तितकीच सोपी आहे. चला तर जाणून घ्या उपवासाची कचोरी रेसिपी.

साहित्य :

 • पाव किलो रताळी
 • दोन बटाटे
 • १ वाटी खवलेले खोबरे
 • ६ हिरव्या मिरच्या
 • अर्धी वाटी बेदाणे
 • चिरलेली कोथिंबीर
 • मीठ
 • साखर

  कृती :

  सर्वप्रथम रताळी आणि बटाटी उकडून घ्यावी. उकडलेली रताळी आणि बटाटे मॅश करून त्यात मीठ घालावे. त्यानंतर खोबरे, बेदाणे, मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर व मीठ घालून सारण तयार करावे. बटाटे आणि रताळ्याची पारी करून त्यात थोडे सारण भरून कचोर्‍या तयार कराव्यात. भगर किंवा शिंघाड्याच्या पिठात घोळवून तुपात तळाव्यात आणि चटणीबरोबर सर्व्ह करा.