घरलाईफस्टाईलबटाट्याचा बहारदार 'शिरा'

बटाट्याचा बहारदार ‘शिरा’

Subscribe

उपवासाचा गोडाचा शिरा

उपवासाला अनेकदा बाहेरचे पदार्थ खावे लागतात आणि त्यांनी पोट देखील भरत नाही. तसेच सतत उपवासाचे नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा देखील येतो. त्यामुळे तुमच्यासाठी एक खास झटपठ तयार होणारी उपवासाची नवीन डिश आहे. ती म्हणजे बटाट्याचा शिरा. ही पाककृती करण्यासाठीही देखील फार सोपी आहे.

साहित्य :

४ ते ५ बटाटे
दीड वाटी साखर (किंवा आपल्या आवश्यकतेनुसार)
२ वाट्या साजूक तूप (नसल्यास वनस्पती तूपही चालेल)
८ ते १० काजू
२ ते ३ वेलदोडे
पाव चमचा जायफळ पावडर

- Advertisement -

कृती :

सर्वप्रथम बटाटे कुकरमध्ये व्यवस्थित शिजवून घ्यावे आणि नंतर थंड करत ठेवावे. काजूचे छानसे काप करावे. वेलदोडे सोडून त्यातील वेलची पूड करून घ्यावी. (पोळपाटावर लाटूनही पूड चांगली होते.) नंतर थंड झालेल्या बटाट्याची साल काढून ते कुस्करून एकजीव करावेत. त्यानंतरची कृती ही रव्याच्या शिऱ्यासारखीच आहे. एका कढईत साजूक तूप तापवून घ्यावे. त्यानंतर कुस्करलेले बटाटे घालून बटाट्याचा खरपूस सुगंध सुटेपर्यंत मध्यम आचेवर परतून घ्यावे. नंतर त्यात साखर, वेलची पूड, जायफळ पावडर टाकून पुन्हा चांगले परतावे. त्यानंतर त्यावर काजूचे काप टाकून गरमागरम असतानाच खाण्यास द्यावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -