अस्थमावर मासे उपायकारक

लहान मुलांमध्ये जाणवणाऱ्या अस्थमावर मासे गुणकारी ठरू शकतात असा दावा संशोधकांनी केला आहे.

Washington
Karimeen_fish_fry

अस्थमा! लहान मुलांमध्ये देखील सध्या अस्थमाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यावर मासे हा उत्तम उपाय होऊ शकतो असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. होय! त्यासंदर्भातील एक रिसर्च पेपर देखील सादर करण्यात आला. अस्थमावर मासे हे गुणकारी ठरू शकतात, असा दावा ला ट्रोब या विद्यापीठानं केला आहे. ह्युमन न्युट्रिशन अँड डाएट या जर्नलमध्ये यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर लहान मुलांमध्ये असणाऱ्या अस्थमासंदर्भात संशोधन केलं गेलं. तसेच त्यावर कोणत्या गोष्टी या उपाय ठरू शकतात यावर देखील संशोधन केलं गेलं. त्यावेळी मासे सेवन केल्यानंतर सहा महिन्यानंतर त्याचा परिणाम जाणवेल असं या संशोधनामध्ये म्हटलं आहे. स्निग्धपदार्थ, साखर आणि मीठांचं अतिसेवन या गोष्टी लहानमुलांमध्ये अस्थमा बळावण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचं स्पष्ट झालं.

चरबीयुक्त माशांमध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा – ३ असतं. त्याचा फायदा हा लहान मुलांच्या फुफ्फुसाचं कार्य सुधारण्यासाठी होतो. असा दावा यावर काम करणाऱ्या संशोधकांनी सांगितलं. त्यामुळे भाजीपाला आणि मासे हे लहान मुलांच्या अस्थमावरती परिणामकारक ठरू शकते असा दावा संशोधकांनी केला आहे.

आजच्या जमान्यामध्ये अस्थामाचं प्रमाण सर्व वयोगटांमध्ये वाढताना दिसत आहे. लहान मुलांना देखील त्याचा सामना करावा लागत आहे. त्यावर आता मासे हे गुणकारी ठरू शकतात असा दावा संशोधकांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here