घरलाईफस्टाईलस्वयंपाकघरातील महत्त्वाच्या टीप्स

स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या टीप्स

Subscribe

स्वयंपाकघरातील काही टिप्स

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

  • बऱ्याचदा भात शिजवताना कुकरच्या भांड्यातून भात उतू जातो. हा भात सांडू नये याकरता कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडेसे मीठ घालावे यामुळे भात सांडत नाही.
  • कणिक मळताना परातीत किंवा ताटात न मळता मोठ्या बाऊलमध्ये मळावी, त्यामुळे अधिक सोपे जाते.
  • तूर डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरुन घातल्यास आमटीला छान आणि वेगळी चव येते.
  • पुलाव करताना तांदळाच्या दीडपट पाणी घालावे आणि २ शिट्ट्या कराव्यात यामुळे भात मोकळा होतो.
  • कोणत्याही पाककृतीत पनीर वापरायचे असल्यास पनीरचे क्यूब्ज करुन घ्या आणि एका भांड्यात उकळते गरम पाणी घेऊन त्यात हे क्यूब्ज १०-१५ मिनिटे ठेवा. मग एका चाळणीत ५ मिनिटे पनीर नितळत ठेवा. आता हे सॉफ्ट पनीर हव्या त्या डीशमध्ये वापरण्यासाटी तयार.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -