घरलाईफस्टाईलहिवाळ्यात 'हे' खाणे टाळा

हिवाळ्यात ‘हे’ खाणे टाळा

Subscribe

हिवाळ्यात हे पदार्थ खाऊ नयेत.

अनेकदा हिवाळ्यात काय खावे. काय करावे याचा आपण सर्वात जास्त विचार करतो. मात्र, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या हिवाळ्यात खाणे टाळले पाहिजे. चलातर जाणून घेऊया कोणत्या गेष्टी हिवाळ्यात खाऊ नये.

दही वर्ज्य करावे

थंडीच्या दिवसात फ्रिजमध्ये ठेवलेल्या दह्याचे सेवन शक्यतो टाळावे. हिवाळ्याच्या दिवसात शक्यतो थंड पदार्थ खाऊ नये. तसेच या दिवसात दही वर्ज्य करावे. दह्याचे सेवन केल्याने विविध प्रकारचे त्वचाविकार होण्याची शक्यता असते. यात एक्झिमा, स्राव येणारे विकार, सोरीयासिस हे विकार होण्याची शक्यता असते. दही अधिक खाल्ल्यास त्रास होऊ शकतो. त्याशिवाय दह्याने कफ वाढतो. त्यातून पुढे घशाचे आजार, वारंवार सर्दी होऊ शकते. ताक किंवा कमी प्रमाणात दही खाण्याची इच्छा असल्यास दुपारच्या वेळी कमी प्रमाणात सेवन केले तरी चालते.

- Advertisement -

तेलकट पदार्थ टाळा

अनेकदा थंडी असल्यामुळे आपण गरमागरम भजी आणि चहाचे सेवन करतो. मात्र, थंडीच्या दिवसात तेलकट पदार्थ खाणे टाळावे. कारण तेलकट पदार्थांमुळे अॅलर्जी होण्याची शक्यता असते. त्यामुळे तेलकट पदार्थ खाऊ नये.

थंड दूध पिऊ नये

अनेकांना रात्री दूधाचे सेवन करुन झोपण्याची सवय असते. मात्र, थंडीच्या दिवसात रात्री झोपताना गरम दूध प्यावे. फ्रिजमधील थंड दुधाचे सेवन करु नये.

- Advertisement -

थंड पाणी पिणे टाळावे

अनेकदा हिवाळ्यात दुपारी ऊन आणि रात्री थंडी लागते. अशावेळी अनेकदा दुपारी उन्हातून आल्यानंतर फ्रिजमधील पाणी प्यावेसे वाटते. मात्र, हिवाळ्यात शक्यतो थंड पाणी पिणे टाळावे.

ब्रेड आणि भात टाळावा

थंडीच्या दिवसात शक्यतो ब्रेड आणि भात खाणे टाळावे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -