घरलाईफस्टाईललॉकडाऊनच्या काळात 'हे' ऑनलाइन कोर्स शिका

लॉकडाऊनच्या काळात ‘हे’ ऑनलाइन कोर्स शिका

Subscribe

आजकालच्या काळात प्रत्येक व्यक्ती ही इंटरनेटचा वापर करते. त्यामुळे आपणही या इंटरनेटचा वापर करुन घर बसल्या ऑनलाईन कोर्स करु शकता. चला तर पाहुया कोणकोणते कोर्स तुम्ही करु शकता.

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे प्रत्येकांना आपला दिवस कसा घालवावा, असा प्रश्न पडला आहे. बरेच जण दररोज वाचन करुन आपला दिवस घालवत आहेत. तर अनेक जण वेगवेगळ्या रेसिपी करुन आपला वेळ सत्कारणी लावत आहेत. मात्र, हा लॉकडाऊन एक डोकेदुखी न समजता घरच्या घरी तुम्ही या काळात काहीतरी नवे शिकू शकता. पण, काय शिकणार असा तुम्हालाही प्रश्न पडला असणार. आज आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही घर बसल्या काय काय करु शकता.

फोटोग्राफी

- Advertisement -

प्रत्येकाला आपला फोटो काढण्याची आवड असते. मग कोणताही समारंभ असो, फोटोग्राफीही आलीच. तर अनेकांना दुसऱ्यांचे फोटो काढण्याची आवडत असते. त्यामुळे या दिवसात तुम्ही फोटोग्राफी हा ऑनलाइन कोर्स नक्की शिकू शकता. फोटोग्राफी शिकण्यासाठी अनेक ऑनलाइन कोर्सेस आहेत. त्यातले काही छोट्या स्वरुपाचे कोर्सेस तुम्ही नक्की शिकू शकता.

- Advertisement -

व्हिडिओ एडिटींग

बऱ्याचदा आपले फार जुने फोटो आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये सापडतात. मग, त्या फोटोचा एक व्हिडिओ करण्याची फार इच्छा होते. मात्र, त्यावेळी आपल्याला व्हिडिओ एडिटी करता येत नाही. त्यामुळे कोणाला तरी करुन द्या, असे सांगावे लागते. मात्र, आता जर तुम्ही या काळात फोटोसह व्हिडिओ एडिटींग करायला शिकलात तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

बेकरी कुकीज

अनेकदा केक किंवा बिस्कीट आपण मार्केटमधून विकत घेऊन येतो. मात्र, सध्या आपण केक किंवा बिस्कीट घरच्या घरी देखील बनवू शकतो. याकरता तुम्ही इंटरनेचा वापर करुन बेकरी कुकीजमधील सर्व पदार्थ बनवण्यास शिकू शकता. त्यासोबत इतरही पदार्थ शिकू शकता.

इतर भाषा शिकणे

आपल्यापैकी बऱ्याच जणांना दुसरी कोणती तरी भाषा शिकावी असे वाटत असते, पण काहीना काही कारणांनी ते राहून जाते. आता आपण आपली इच्छा पूर्ण करु शकता. कारण आपल्याला तशी संधी मिळाली आहे. चला तर मग आजपासूनस शिका एखादी नवीन भाषा.

योगा आणि व्यायाम

आजकाल सगळेच जण आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी जिममध्ये किंवा योगासनांच्या वर्गाला जातात. स्वत:चे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी सगळेच धडपड करत असतात. मात्र, आता तुम्हीच तुमचे शरीर निरोगी ठेऊ शकता. याकरता तुम्ही ऑनलाइन कोर्सचा वापर करु शकता.

Regular exercise

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -