Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल वॉशिंग मशीनमध्ये कपड्यांसह 'या' गोष्टीही धुवू शकता, एकदा ट्राय तर करा

वॉशिंग मशीनमध्ये कपड्यांसह ‘या’ गोष्टीही धुवू शकता, एकदा ट्राय तर करा

आपणास असे वाटत असेल की वॉशिंग मशीनमध्ये फक्त कपडे धुणे शक्य आहे, तर तसे नाही. कारण कपड्यांसह अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये धुवू शकता. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी.

Related Story

- Advertisement -

आजकाल बहुतेक घरात कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर केला जातो. परंतु, असे बरेच लोक आहेत ज्यांना वॉशिंग मशीनमध्ये काय धुतले जाऊ शकते आणि काय धुतले जाऊ शकत नाही, हे माहित नाही. कारण कपड्यांव्यतिरिक्त आपल्याकडे बरेच काही गोष्टी आहेत. ज्या वॉशिंग मशीनमध्ये धुतल्या जाऊ शकतात. चला तर जाणून घेऊया वॉशिंग मशीनमध्ये कपड्याव्यतिरिक्त अजून कोणत्या गोष्टी धुतल्या जाऊ शकतात.

योगा मॅट

- Advertisement -

अनेकजण सुदृढ राहण्यासाठी योगा करतात आणि हा योगा करण्यासाठी बरेच जण मॅटाचा देखील वापर करतात. त्यामुळे बऱ्याचदा ते मॅट खराब झाले का ते हाताने स्वच्छ केले जाते. परंतु, ते मॅट हाताने धुतल्यास लगेच वाळत नाही. अशा वेळी ते मॅट वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यास स्वच्छ होते आणि लवकर वाळते.

स्नीकर्स

- Advertisement -

वॉशिंग मशीनमध्ये कॅज्युअल शूज किंवा स्नीकर्स देखील धुवू शकता. स्नीकर्स धुताना मात्र, वॉशिंग मशीन स्लो मोडमध्ये ठेवणे गरजेचे आहे.

किचन अ‍ॅक्सेसरीज आणि बॅग

स्वयंपाकघरात साफसफाईचे असणारे साहित्य आणि इतर रबर वस्तू देखील तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये साफ करू शकता. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वॉशिंगमध्ये भाजी पिशव्याही स्वच्छ करू शकता. कॉटन बॅग वापरत असल्यास तिही तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ करु शकता.

हेयर अ‍ॅक्सेसरीज

वॉशिंग मशीनमध्ये तुम्ही हेयर अ‍ॅक्सेसरीज देखील धुऊ शकता. यामध्ये टोपी, केसाचा बँड किंवा इतर केसांचे सामान धुवू शकता. या गोष्टी वॉशिंग मशीनमध्ये ठेवा आणि जेंटल सायकल मोडवर चालवा. ते धुण्यासाठी गरम पाण्याची आवश्यकता नाही जर या गोष्टींमध्ये कागदासारख्या गोष्टी असतील तर त्या वॉशिंग मशीनमध्ये धुवू नका.

टेबल क्लॉथ आणि माऊस पॅड

दररोज वापरण्यात येणाऱ्या माऊस पॅडमध्ये बऱ्याचदा धूळ, माती जमा होते. परंतु, लोक केवळ टेबलचे कापड धुतात. अशा परिस्थितीत आपण वॉशिंग मशीनमध्ये आपले माऊस पॅड देखील धुवू शकता.

- Advertisement -