घरलाईफस्टाईलसुंदर डोळ्यांसाठी

सुंदर डोळ्यांसाठी

Subscribe

डोळ्यांच्या मेक-अप योग्य पध्दतीने केला तर चेहर्‍याच्या सौंदर्यात अनेक पटीने वाढ होते. जाणून घेऊयात आय मेक-अप करतानाच्या काही महत्वाच्या गोष्टी.

कन्सिलरचा वापर-

डोळे उठून दिसण्यासाठी कन्सिलरचा वापर करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

विशेषत: छोटया डोळ्यांसाठी हे जास्त फायदेशीर आहे. कन्सिलरच्या वापराने डोळ्यांभोवती असलेली काळी वर्तुळे सहज लपवण्यास मदत होते आणि त्यामुळे डोळे आकर्षक दिसण्यास मदत होते.

हायलाईट करा ब्रो बोन –

पांढर्‍या रंगाच्या हायलाइटरला ब्रो बोन म्हणजे आय ब्रोच्या खालच्या भागाला लावा. यामुळे तुमचे डोळे अधिक उठावदार दिसतील. तुम्ही डोळ्यांच्या खाली हायलायटरचा वापर करू शकता.

- Advertisement -
गडदपणा दिसण्यासाठी –

डोळ्यांचा खोलवरपणा दिसण्यासाठी थोड्याशा प्रमाणात गडद मीडियम टोंड शेड लावा आणि ब्रशच्या साहाय्याने डोळ्यांच्या वर पसरवा. यामुळे डोळे मोठे दिसतील आणि अधिक आकर्षक दिसतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -