घरलाईफस्टाईलचिरतरुण त्वचेसाठी

चिरतरुण त्वचेसाठी

Subscribe

वाढत्या वयात चेहर्‍यावर सुरकुत्या दिसू लागतात. या सुरकुत्या लपविण्यासाठी विविध सौंदर्यप्रसाधनांचा वापर केला जातो. मात्र, अनेकदा या सौंदर्यप्रसाधनांच्या दुष्परिणामांचा सामना करावा लागतो. सकस आहार, व्यायामाचा रोजच्या जीवनात समावेश केल्यास चेहर्‍यावरील सुरकुत्या नाहीशा होऊन त्वचा तजेलदार दिसण्यास मदत होते.

संतुलित व पौष्टिक आहार
आपल्या आहारात नेहमी हिरवा भाजीपाला, ऋतूमानानुसार फळे तसेच दुधाचा समावेश करा. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळून त्वचेला पोषणही मिळते.

- Advertisement -

व्यायाम
सुदृढ आरोग्यासाठी जसा शरीराला व्यायाम महत्त्वाचा आहे, तसाच चेहर्‍याच्या त्वचेसाठीदेखील व्यायाम महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्यायाम करताना इंग्रजी अक्षर इ आणि ओ बोला, म्हणजे चेहर्‍याचा चांगल्याप्रकारे व्यायाम होतो. ही प्रक्रिया ५ ते ७ मिनिट करा यामुळे चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी मदत होते.

मूगडाळ
चेहर्‍याच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी व्हिटॅमिन इ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. त्यासाठी सकाळी भिजवलेली मूगडाळ चावून खा. यामध्ये व्हिटॅमिन इ जास्त प्रमाणात असते. याचे नियमित सेवन केल्याने तुम्ही बरेच वर्ष तरुण राहू शकता.

- Advertisement -

आवळ्याचे सेवन
त्वचेच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन सी देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. व्हिटॅमिन सी चेहरा आणि केसांसाठी खूपच फायदेशीर आहे. यासाठी नियमित आवळा खाल्ला पाहिजे. कारण आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण भरपूर आहे. जे तुम्हाला तरुण ठेवण्यासाठी मदत करते.

गुलाब पाणी
गुलाब पाण्यासोबत २-३ थेंब ग्लिसरीन, १-२ चमचे लिंबाचा रस मिसळून झोपण्याच्या अगोदर चेहर्‍याला लावा. असे केल्याने चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -