लसणीच्या पातीची चटणी

Mumbai
लसणीच्या पातीची चटणी

जेवणासोबत चटणी असेल तर जेवणाची लज्जत अधिकच वाढते आणि त्यात जर लसणीच्या पातीची चटणी असेल तर अति उत्तम. त्यामुळे लसणीच्या पातीची चटणी कशी करावी हे नक्की पहावे.

साहित्य

लसणीची पात – १ जुडी
टोमॅटो -३
हिरव्या मिरच्या ३ – ४
कपभर कोथिंबीर
चमचाभर जीरे, मोहरी
चवीपुरते मीठ
फोडणीसाठी तेल
हिंग

कृती

लसणाची पात सर्वप्रथम धुवून चिरून घ्यावी. त्यानंतर चिरलेली पात, टोमॅटो, कोथिंबीर, मिरच्या, जीरे आणि मीठ मिक्सरला बारीक वाटून घ्यावे. नंतर तेल कडकडीत तापवून हिंग मोहोरीचा तडका करा आणि त्यात वाटलेली पेस्ट घाला. पाणी आटेपर्यंत परता. अशाप्रकारे हिरवी चटणी तयार.