घरलाईफस्टाईलमुलांशी मैत्री महत्वाची

मुलांशी मैत्री महत्वाची

Subscribe

अनेक पालकांना असे वाटते की, इतरांशी तुलना केल्यानं मुलांना प्रोत्साहन मिळेल आणि मुलं अधिक मेहनत करायला लागतील, पण थांबा असा विचार करा, की ही तुलना तुम्हाला जरी योग्य वाटत असली तरी ती तुमच्या मुलांना योग्य वाटते का? किंवा तुमची मुले ही तुमच्यासारखाच विचार करतात का?

अनेक पालकांना असे वाटते की, इतरांशी तुलना केल्यानं मुलांना प्रोत्साहन मिळेल आणि मुलं अधिक मेहनत करायला लागतील, पण थांबा असा विचार करा, की ही तुलना तुम्हाला जरी योग्य वाटत असली तरी ती तुमच्या मुलांना योग्य वाटते का? किंवा तुमची मुले ही तुमच्यासारखाच विचार करतात का? हे सर्व आणि त्यांच्या सर्व समस्या जाणून घेण्यासाठी त्यांचे मित्र व्हा आणि मग त्यांच्या बाजूने विचार करा.

अभ्यास म्हटले की आपसूकच पालक आणि मुलांचे नाते पुढे उभे राहते.परीक्षेच्या काळात तर मुलांएवढेच दडपण पालकांनी घेतलेले असते. कधी कधी तर असे वाटते की विद्यार्थी हे स्वत:साठी नाही तर समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच मेहनत घेतात.पालकांना वाटतं की मुलांची इतरांशी तुलना केली की, त्यांना प्रोत्साहन मिळेल. ओळखीतील समवयीन मित्रांशी किंवा भावंडांशी होणारी तुलना ही मुलांसाठी खूप भीतीदायक आहे. मग तो वर्गात पहिला क्रमांक पटकावणारा असो किंवा काठावर पास होणारा विद्यार्थी असो.प्रत्येकाला परीक्षेचे दडपण येतंच.

- Advertisement -

उदा. बघ तो विजू किती हुशार आहे, तो खेळण्यात वेळ घालवत नाही. दररोज अभ्यास करतो.आणि तू परीक्षा जवळ आली तरी अभ्यासाचे नाव घेत नाही. यावेळी तुला भरपूर अभ्यास करून त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळायला हवेत.
अशी एक ना अनेक उदाहरणे पालक त्यांच्या मुलांना देत असतात.या सर्वांमागचा उद्देश मात्र एकच मुलांना जास्त मार्क्स मिळावेत आणि पुढील आयुष्यात त्यांचे करिअर चांगले व्हावे.

जवळपास प्रत्येकच पालकांची ही सवयच असते की आपल्या मुलांना अभ्यास करायला भाग पाडण्यासाठी इतरांच्या मुलांशी तुलना करावी जेणे करून मुले अभ्यासाला बसतील. एक प्रकारे पालकांना त्याच्या मुलांच्या करिअरविषयी असलेली अमाप चिंता यातून व्यक्त होते आणि याचे बळी जातात ते त्यांचीच मुले. खरे पाहता मुलांना विश्वासात घेऊन त्यांचे मित्र बनून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे असते. योग्य मार्गदर्शनामुळे मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या प्रगतीत मदत करायला हवी. न की, त्यांच्याशी इतरांची तुलना करावी.

- Advertisement -

इतरांशी तुलना केल्याने मुले तुमच्या पुढे जरी जोमाने अभ्यास करताना दिसत असले तरी मनातून मात्र ते खूप दडपणातून जात असतात. सतत तुलना केल्याने मुलांवर जास्त दडपण येऊ शकतं. त्यामुळे तुमच्या मुलांवर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.म्हणून तुम्ही जर तुमच्या मुलांशी असे वागत असाल तर या पुढे असे न वागता. त्यांच्याशी घनिष्ठ मैत्री करून त्यांच्या अभ्यासातील समस्या जाणून घ्या आणि त्याच्या प्रगतीत त्यांना साथ द्या.पालकांना स्पर्धा म्हणजे नकळतपणे आपण मुलांना प्रोत्साहन देतोय असे वाटते. पण मुळात हे जास्तच हानिकारक ठरू शकतं. यामुळे तुम्ही मुलांच्या नकारात्मक विचारांना नकळतपणे खतपाणी घालता.

बर्‍याच पालकांना ही सवय असते की ते सतत मुलांना त्यांच्या आर्थीक स्थितीबद्दल बोलून दाखवतात. त्यांच्या शिक्षणासाठी किती खर्च केला हे बोलत असतात. मुलांना सतत जाणीव करून देतात की त्यांच्या शिक्षणासाठी आई-वडिलांना खूप कष्ट करावे लागलेत वगैरे- वगैरे. पण या सर्व बाबी बोलल्यामुळे मुलांवर आणखी दडपण वाढण्याची शक्यता असते. त्यातच जर मुलांना अभ्यासात अपयश आले तर ती जास्त नैराश्यात जातात. माझ्याकडून आयुष्यात काहीच होऊ शकणार नाही. मी आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही. माझ्या शिक्षणासाठी त्यांनी केलेले कष्ट मी वाया घालवलेत. असे एक ना अनेक विचार मुलांना नैराश्याकडे नेण्यास कारणीभूत ठरू शकतात.

प्रत्येक पालकाने हे लक्षात घ्यायला हवे की, उच्च शिक्षण घेऊनच माणूस मोठा होतो असं नाही. मुलांना जर अभ्यासाव्यतीरिक्त इतर कुठल्याही क्षेत्रात आवड असेल तर त्यांच्यावर अभ्यासाची जबरदस्ती करू नका. याचा अर्थ असा अजिबातच नाही की तुम्ही त्यांना अजिबातच अभ्यास करू नकोस म्हणा. तर थोडेफार मार्क्स मिळवण्या इतपत त्यांनी नक्कीच अभ्यास करायला हवा मात्र कुठलेही दडपण न घेता.मुलांना सतत प्रोत्साहन द्या बघा ते नक्की यशस्वी होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -