सौंदर्य खुलवण्यासाठी फळांचा करा वापर!

Mumbai
fruit face pack
फळांचा फेस पॅक

फळं खाणं आरोग्यासाठी उत्तमच. ऋतुमानानुसार बाजारात वेगवेगळी फळे येत असतात. ऋतुप्रमाणे फळे खाणे आरोग्यास चांगले असते. मात्र ही बाजारात येणारी फळं फक्त आरोग्यदायी नव्हे तर सौंदर्यवर्धकही आहेत. तसेच ही फळं तुमचे सौंदर्य फुलवण्यास मदत करतात. फळं जसे आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जातात, तसेच ते सौंदर्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहेत.

कैरी : हल्ली कैऱ्या बाजारात दिसायला लागल्या आहेत. या कैऱ्या तुमची त्वचा मुलायम करण्यास मदत करतील. कैरी उकळवून त्याचा गर काढून चेहरा व मानेवर चोळा आणि वाळल्यानंतर धुऊ घेणे.

संत्री : संत्र्याची साल उन्हात वाळवून त्याची पूड करून ती दुधात कालवा. हे तयार झालेले मिश्रण चेहऱ्यावर लावा यामुळे तेलकट त्वचेस याचा अधिक फायदा होऊन चेहरा उजळण्यास मदत होईल.

डाळिंब : पिकलेल्या डाळिंबाचे दाणे चेहऱ्यावर दररोज चोळा त्वचेचा रंग हलका आणि गुलाबी होण्यास मदत होईल. ओठांवरुनही त्याचा रस फिरवा, ओठांचा रंग सुधारेल. चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी डाळिंबाची साल कच्च्या दुधात वाटा आणि ती पेस्ट चेहरा, मानेवर लावा. चेहरा सुकल्यावर धुऊन घ्या.

पपई : पपईचा गर उपयुक्त सौंदर्य प्रसाधन म्हणून वापरात आहे. पपईचा गर चेहऱ्यावर चोळल्यास डाग, पुरळ कमी होण्यास मदत होते त्वचेचं आरोग्य सुधारते.

नारळपाणी : नारळपाणी नियमितपणे चेहऱ्यावर लावा त्याने चेहऱ्यावरील डाग, राप निघून जाण्यास मदत होते.

केळी : पिकलेल्या केळ्याचा गर आणि मलई मिक्स करुन चेहऱ्यावर लावा. पंधरा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर मधात बुडवलेल्या केळ्याच्या पातळ चकत्या चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी चेहरा धुवा यामुळे चेहऱ्यावरील पुटकुळ्या असतील तर केळ्याचा गर चोळून तो अर्धा तास ठेवा कच्च्या दुधानं चेहरा धुवा.

सफरचंद : सफरचंदाच्या रसात थोडे गुलाबजलाचे थेंब घालून चेहऱ्यावर लावा किंवा सफरचंदाचा गर उकडवून तो लावल्यास सावळा रंग उजळण्यास मदत होईल.

खरबूज : त्वचा राट असल्यास खरबुजाचा गर लावा

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here