घरलाईफस्टाईलफर्निचर सफाई टिप्स 

फर्निचर सफाई टिप्स 

Subscribe

*लाकडी कपाटे आणि टेबलांच्या भेगांमधून आर्द्रतेमुळे दुर्गंधी येते. अशा ठिकाणी सुकलेल्या चुन्याचे काही तुकडे ठेवून द्या. चुना आर्द्रता शोषून घेतो. जर लाकडाला वाळवी लागली असेल तर वाळवी प्रतिबंधक औषधांचा वापर करा. टारपीनच्या तेलाने देखील वाळवीला प्रतिबंध करता येतो.

*चामडी वस्तूंसाठी सँडल सोप जे बूट चप्पल बनविणार्‍यांकडे मिळते ते लावा. चामडी वस्तूंवर पडलेल्या डागांवर पेट्रोल लावल्याने डाग निघून जातात.

- Advertisement -

*प्लास्टिकचे फर्निचर कोमट पाण्याने सोप सोल्युशन लावून पुसून टाका.

*लोखंडी सामान कोमट पाण्यात सोप सोल्युशन टाकून साफ करा. गंज पकडला असेल तर त्या ठिकाणी रॉकेल लावून पुसून काढा. नंतर ग्रीस लावा म्हणजे गंज पसरणार नाही. लोखंडी फर्निचर गरम पाण्यात अमोनिया टाकूनही साफ करता येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -