बाप्पासाठी खास विविध प्रकारचे मोदक

खमंग आणि स्वादिष्ट मोदक नक्की ट्राय करा

Mumbai
modaks
बाप्पासाठी खास विविध प्रकारचे मोदक

सर्वांच्या लाडक्या बाप्पाचा आवडता नैवद्य म्हणजे मोदकत्यामुळे बाप्पा घरी आल्यानंतर घरा घरात खमंग सुटतो तो म्हणजे उकडीच्या मोदकाचा. मात्र, दरवर्षी उकडीचे मोदक असल्यामुळे काहीतरी वेगळे गोडाचे पदार्थ करावेस वाटतात. परंतु, बाप्पाला मोदक आवडत असल्यामुळे मोदक करावे लागतात. त्यामुळे आपण यंदा बाप्पाकरता खास विविध प्रकारचे ११ मोदकांच्या रेसिपी पाहणार आहोत.

पंचखाद्य मोदक

पंचखाद्य मोदक म्हणजे ज्यात पाच प्रकारचे सारण येते. पंचखाद्य मोदक तयार करण्यासाठी खारीक, खसखस, बदाम, काजू आणि साखर एकत्र करुन सारण मैदाच्या पारीत भरुन डीप फ्राय करा. अशाप्रकारे तुमचे पंचखाद्य स्वादि।ष्ट मोदक तयार होतील.

चॉकलेट मोदक

चॉकलेट म्हटले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला चॉकलेट हे आवडते. हे चॉकलेट मोदक झटपट बनवता येतात. चॉकलेट मोदक बनवण्यासाठी खवा, खोबरे, दाणे, एकदम बारीक करुन त्याला मोदकाचा आकार द्या. एकेका मोदकाला हॉट चॉकलेट सॉसमध्ये बुडवून फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.

काजू मोदक

काजू मोदक करताना काजूची पूड आणि वेलची पावडर एकत्र करावी. त्यानंतर यामध्ये थोडासा खवा मिक्स करावा. त्यानंतर याला मोदकाचा आकार द्यावा.

पुरणाचे मोदक

पुरण पोळीचे मोदक बनवताना पुरणाचे सारण मैदाच्या पारीमध्ये भरुन त्याचे मोदक वाफवून किंवा तळून घेता येतील.

गुलकंदाचे मोदक

गुलकंदाचे मोदक तयार करण्यासाठी तांदळाची उकड काढावी. त्यानंतर त्यात गुलाब पाकळ्या किंवा थोडे गुलाबपाणी मिक्स करावे. त्यानंतर उकडीमध्ये गुलकंदाचे सारण भरुन हे मोदक मंद आचेवर तळून किंवा वाफवून घ्यावेत.

गूळाचे मोदक

विदर्भात गूळ – कोहळ्याचे मोदक बनवले जातात. गूळ, लाल कोहळा आणि तेवढेच कणिक घेऊन एकत्र मळावे. त्यानंतर मोदकाचा आकाप देऊन मंद आचेवर तळावे.

 

डिंकाचे मोदक

डिंक तळून डिंकाच्या लाडवाचे मिश्रण करावे. हे मिश्रण कणकेच्या पारीत भरुन मंद आचेवर तळून घ्यावे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here