घरलाईफस्टाईलगणेश चतुर्थी निमित्ताने खास तयार करा 'हळदीच्या पानातल्या पातोळ्या'

गणेश चतुर्थी निमित्ताने खास तयार करा ‘हळदीच्या पानातल्या पातोळ्या’

Subscribe

गणेश चतुर्थीला हळदीच्या पानातल्या पातोळ्या आवर्जुन केल्या जातात. पातोळ्या खाताना हळदीचा सुगंध आणि खोबऱ्याची चव खूप छान लागते. त्यामुळे गणेश चतुर्थी निमित्ताने हळदीच्या पानातल्या पातोळ्या कशा करतात हे आज आपण पाहणार आहोत.

साहित्य

- Advertisement -

तांदूळ दोन कप, हळदीची पाने पाच किंवा सहा, चाप कप किसलेले खोबरं, १/४ कप साजूक तूप, १/२ कप मुगडाळ, १/४ कप खसखस, २ चमचे वेलची पावडर आणि ३ कप किसलेला गूळ

कृती

- Advertisement -

पहिल्यांदा तांदूळ स्वच्छ धुवू घ्यायचे. मग ते आठ तास भिजवून ठेवायचे. भिजवल्यानंतर मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यायचे. त्याचप्रमाणे मुगडाळ एक कप पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवायची. मग एका भांड्यात तूप गरम करून मुगडाळ मंद आचेवर भाजून घ्यावी. मग त्यात खोबरं घालून भाजावं. त्यानंतर त्यात गूळ, वेलची, खसखस घालून एकत्र भाजून झाल्यावर मिश्रण थंड करावे. सध्या काळात सगळ्या वस्तू स्वच्छ धुणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे हळदीचे पाने स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यावीत. मग तांदळाचे वाटलेले पिठ प्रत्येक पानावर लावून घ्यावे. त्यानंतर पातळ पसरून झाल्यावर खोबऱ्याचे मिश्रण पसरावे. पान एका बाजूला दुमडून घ्यावे आणि पानाच्या कडा एका बाजूने बंद कराव्यात.

हे सर्व झाल्यानंतर एका भांड्यात पाणी गरम करावे. त्यात स्टॅण्ड ठेवावा. मग एका ताटाला तूप लावून त्यात पानाच्या पातोळ्या ठेवाव्यात. त्यानंतर ताट भांड्यावरील स्टॅण्डवर ठेवून झाकण लावून २० ते १५ मिनिटे उकडावे. मग उकडल्यानंतर भांड्यावरील झाकण काढून ठेवावे. अशा प्रकारे गणेश चतुर्थानिमित्ताने तुम्ही पानातल्या पातोळ्या करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -