Ganga Dussehra 2019: ७५ वर्षांनंतर येतोय हा ‘दिव्य योग’

गंगा दसऱ्याचे औचित्य साधून हजारो श्रद्धाळू भाविक हरिद्वार आणि वाराणसीमध्य़े गंगा नदीत बुडी घेतात

Mumbai

१२ जून रोजी गंगा दसरा साजरा केला जातो. या दिवशी अनेक जण पवित्र मानल्या जाणाऱ्या गंगा नदीत अंघोळ करून मोठ्या प्रमाणात दान-धर्म करतात. सकाळच्या ब्रम्ह मुहूर्तावर अंघोळ करून पुजा- अर्चना करून दिवसभर उपवास केला जातो. गंगा दसऱ्याचे औचित्य साधून हजारो श्रद्धाळू भाविक हरिद्वार आणि वाराणसीमध्य़े गंगा नदीत बुडी मारतात. तसेच नदीच्या किनाऱ्यावर होम-हवन आणि तप देखील करतात.

भारतातून गंगा नदी वाहते. तीच नदी उत्तराखंडच्या गंगोत्री मधून उगम पावते. भारताच्या बऱ्याच महत्त्वपुर्ण ठिकाणातून हिच गंगा नदी जाते. गंगा नदीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान दिले जाते. असे मानले जाते की, गंगेत स्नान केल्याने सर्व पापातून मुक्तता होते.

कधी येतो गंगा दसरा हा योग?

हिंदू दिनदर्शिकेनूसार प्रत्येक वर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्ष दशमीच्या तिथीला गंगा दसरा साजरा केला जातो. तर इंग्रजी दिनदर्शिकेनूसार गंगा दसरा मे किंवा जून महिन्यात येतो. यंदा तो १२ जूनला सर्वत्र साजरा करण्यात येत आहे.

७५ वर्षांनंतर आला ‘दिव्य योग’

गंगा दसऱ्याचा शुभ महोत्सव ७५ वर्षांनी १० दिव्य योग यंदा घडून आला आहे. या आलेल्या योगात ज्येष्ठ योग, व्यतिपात योग, गर करण योग, आनंद योग, कन्या राशीतील चंद्र व वृषभ राशीच्या सूर्यच्या दशेतील महायोगाची निर्मिती होत आहे. त्यामुळे गंगेत बुडी मारून, स्नान करून पापमुक्ती होते, असे सांगण्यात येत आहे.

गंगेत स्‍नान करण्याचे शुभ मुहूर्त

या शुभ मुहूर्तवर पूजा, दानधर्म आणि स्नान करता येईल.
११ जून रात्री ८.१० पासून १२ जून संध्याकाळी ६.२७ वाजेपर्यंत गंगेत स्नान करता येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here