घरलाईफस्टाईलतुमच्याही घशात होते का 'खवखव'? हे करा उपाय

तुमच्याही घशात होते का ‘खवखव’? हे करा उपाय

Subscribe

हवामान बदल्यानंतर घसा खवखवणे किंवा घसा बसणे अशा अनेक तक्रारी उद्भवतात. यामध्ये घशात दुखणे, खाज येणे, घशात कफ साठणे आणि आवाज बदलणे अशा एक ना अनेक समस्या निर्माण होतात. अशावेळी गुळण्या केल्यास तुमच्या घशातील खवखव कमी होण्यास मदत होते. मात्र, मिठाच्या नाही तर इतरही पदार्थ मिक्स करुन त्या पाण्याने गुळण्या करु शकता.

  • सहन होईल तेवढेच गरम पाणी एका ग्लासात घेऊन त्यात एक चमचा मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात.
  • तुरटीचा खडा देखील या पाण्यात टाकून गुळण्या केल्यास आराम मिळतो.
  • मिठासोबत २ चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून गुळण्या केल्याने आराम मिळतो.
  • गरम पाण्यात मिठासोबत हळद वापरणे देखील फायदेशीर ठरते. कारण याचे गुणधर्म अँटीबेक्टेरियल असतात.

टीप : तुरटी, सोडा किंवा हळद यापैकी मिठासोबत केवळ एकच वस्तू वापरावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -