घरलाईफस्टाईलचमचमीत 'गार्लिक चिकन'

चमचमीत ‘गार्लिक चिकन’

Subscribe

'गार्लिक चिकन' रेसिपी

दर आठवड्याच्या रविवारी काय करावे असा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो. त्यात सर्वच मंडळी या दिवशी घरी असतात. अशावेळी जेवणात चिकनची मेजवानी असेल तर एक वेगळीच लजत येते. चला तर जाणून घेऊया चमचमीत ‘गार्लिक चिकन’ची मेजवानी.

साहित्य :

१ किलो चिकन
१ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
३ ते ४ लसूणचे कांदे
४०० ग्रॅम दही
चिकन मसाला
गरम मसाला
हळद
कसूरी मेथी
काश्मिरी मिर्ची पावडर
चवीनुसार मीठ

- Advertisement -

कृती :

सर्वप्रथम चिकनला मीठ चोळून स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर लसूण बारीक चिरून घ्या. एका भांडयात चिकन घेऊन त्याला ४०० ग्रॅम दही एक चमचा तेल, मीठ, बारीक चिरलेला लसूण, हळद, १ चमचा काश्मिरी मिर्च पावडर लावून ३ ते ४ तास मेरिनेट करण्यास ठेवावे. नंतर एका पसरट कढईमध्ये तेल तापवून त्यात मेरिनेटेड चिकन घालावे आणि मध्यम आचेवर झाकण ठेऊन शिजवावे. गॅसवरून उतरवण्याच्या १० मिनिटे अगोदर त्यात कसूरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ चमचा काश्मिरी मिर्च पावडर, चिकन मसाला, गरम मसाला टाकून झाकण काढून ग्रेव्ही थोडी घट्ट होऊ द्या. चिकनच्या तुकड्यांना स्पर्श न करता चमच्याने ग्रेव्ही थोडी ढवळा आणि गॅस बंद करा. अशाप्रकारे तुमचे चमचमीत ‘गार्लिक चिकन’ तयार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -