घरलाईफस्टाईलमायग्रेनच्या त्रासावर गुणकारी आल्याचा काढा

मायग्रेनच्या त्रासावर गुणकारी आल्याचा काढा

Subscribe

मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी नियमित प्या आल्याचा काढा

मायग्रेन हा एक डोकेदुखीचा विकार आहे. मेंदूच्या कार्यामध्ये काही बदलामुळे उद्भवणार्‍या डोकेदुखीला मायग्रेन असे म्हटले जाते. मायग्रेनच्या त्रासामध्ये डोक्याचा एक भाग प्रचंड दुखतो. हे दुखणे असह्य होते. मेंदूमधील रक्तप्रवाहामध्ये बदल झाल्यास ही डोकेदुखी उद्भवते.

- Advertisement -

मायग्रेनच्या विकारामध्ये तीव्र डोकेदुखी, काहींमध्ये उलट्या होणे व मळमळणे अशी लक्षण दिसतात. हा त्रास औषधांनी आटोक्यात आणला जाऊ शकतो पण नैसर्गिक उपाय तुमच्या शरीरावर दुष्परिणाम न करता मायग्रेनचा त्रास दूर करण्यास मदत करतात. या आजारावर उपयुक्त असणारा घटक म्हणजे आलं. मायग्रेनचा त्रास कमी करायचा असेल तर आल्याचा काढा नियमित प्यायला हवा.

असा बनवा आल्याचा काढा

  • मध्यम आकाराचा आल्याचा तुकडा स्वच्छ धुवून व सोलून घ्यावा.
  • आल्याचे लहान तुकडे करा किंवा किस करा.
  • उकळत्या पाण्यात आले घालून १० ते १५ मिनिटे उकळा.
  • काही वेळाने कोमट काढा गाळून प्या.
  • अवश्यक वाटल्यास त्यात मध व लिंबाचा रस मिसळा.

- Advertisement -

मायग्रेनवर गुणकारी आलं

मायग्रेनची डोकेदुखी पळवण्यासाठी आलं हे परिणामकारक ठरते. आल्यामध्ये दाहशामक गुणधर्म असतात. यामुळे मायग्रेनची समस्या कमी होण्यास मदत होते. डोकेदुखीची समस्या कमी करण्याची क्षमता आल्यामध्ये असल्याने हे फारच गुणकारी ठरते. याचबरोबर प्राचीन काळापासून आलं पचनाच्या विकारामध्ये वापरले जाते. त्यामुळे मायग्रेनच्या समस्यांमधील मळमळ व उलट्यांचा त्रास कमी होण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -