हार्ट फेल्युअर त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी गोड बातमी

हार्ट फेल्युअर त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी आता टीएव्हीआय हे जीवनरक्षक कार्डिअटॅक उपचार तातडीने उपलब्ध होणार आहेत. हिंदूजा हॉस्पिटल हे टीएव्हीआय उपचार करण्यासाठी अधिकृत असलेले मुंबईतील / पश्चिम भारतातील पहिले रुग्णालय ठरले आहे.

Mumbai
Heart-Failure
प्रातिनिघिक फोटो

ऑर्टिक स्टेनॉसिसचा (सोप्या शब्दांत हार्ट फेल्युअर) त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी आता टीएव्हीआय (ट्रान्सकॅथेटर ऑर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन) हे जीवनरक्षक कार्डिअटॅक उपचार तातडीने उपलब्ध होणार आहेत. टीएव्हीआय मान्यता मिळाल्यानंतर, खारमधील हिंदूजा हॉस्पिटल हे प्रॉक्टरविना टीएव्हीआय उपचार करण्यासाठी अधिकृत असलेले मुंबईतील / पश्चिम भारतातील पहिले रुग्णालय ठरले आहे. टीएव्हीआयसाठी प्रतीक्षेचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याने, सर्जिकल जोखीम उच्च असणाऱ्या रुग्णांसाठी हे उपचार अत्यंत फायदेशीर असणार आहे.

“आमच्या रुग्णालयासाठी टीएव्हीआय मान्यता मिळाल्याबद्दल आम्ही अतिशय खूष आहोत. ओपन हार्ट सर्जरीपेक्षा टीएव्हीआय हे अतिशय उपयुक्त तंत्र असून रुग्णासाठी ते फायदेशीर ठरणार आहे.” – डॉ. अविनाश सुपे, कार्यकारी संचालक हिंदूजा हॉस्पिटल

मान्यता प्राप्त प्रक्रिया

टीएव्हीआय ही ऑर्टिक स्टेनॉसिस नावाच्या ऑर्टिक व्हॉल्व्हच्या असाधारण अरुंदपणावर उपचार करणारी मिनिमली इन्व्हेजिव्ह प्रोसिजर आहे. टीएव्हीआय ही यूएसएफडीए मान्यताप्राप्त प्रक्रिया असून ती साधारणतः ऑर्टिक व्हॉल्व्हसाठी केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी पर्याय आहे. तसेच, ही प्रक्रिया वय, अन्य आजार, अगोदर झालेल्या बायपास सर्जरी यामुळे मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रियेचा धोका असणाऱ्या रुग्णांवर केली जाते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here