गणेशोत्सव स्पेशल – गुड्डे बिस्किट मोदक

गुड्डे बिस्किट मोदक रेसिपी

Mumbai
goody biscuit modak recipe in marathi
गुड्डे बिस्किट मोदक

बाप्पाचा आवडता नैवद्य म्हणजे मोदक…त्यामुळे आतापर्यंत आपण नारळ, चॉकलेट, पनीर, खवा अशा वेगवेगळ्या मोदकांची आपण रेसिपी पाहिली आहे आणि आज आपण गुड्डे बिस्कीटपासून मोदक कसा तयार करायचा हे पाहणार आहोत.

साहित्य

गुड्डे बिस्किट
दूध
रंगीत बॉल्स

कृती

सर्वप्रथम बिस्किटाचे छोटे तुकडे करुन घ्यावे. मिक्सरमध्ये बिस्किट बारीक करुन घ्या. त्यानंतर बारीक केलेले बिस्किट एका भांड्यात घेऊन त्यामध्ये थोडे दूध घालून एकत्र करुन घ्या. आता त्यामध्ये रंगीत बॉल्स घालून एकत्र करुन घेऊन हे मिश्रण मोदक साचामध्ये घालून मोदक तयार करुन घ्या. अशाप्रकारे तुमचे गुड्डे बिस्कीटपासून मोदक तयार.

[टीप : आपल्या आवडीप्रमाणे आपण कोणतेही दुसरे बिस्कीट घेऊ शकता]

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here