घरलाईफस्टाईलझटपट पनीर कॉर्न

झटपट पनीर कॉर्न

Subscribe

चविष्ट, चटकदार, क्रिस्पी पनीर कॉर्न.

साहित्य

- Advertisement -
  • १०० ग्रॅम किसलेले पनीर
  • अर्धा कप कॉर्न
  • ८ ब्रेड स्लाइस
  • २ बारीक चिरलेले कांदे
  • अर्धा चमचा आलं-लसूण पेस्ट
  • २-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • १ लहान चमचा काळी मिरीपूड
  • २ चमचे लिंबाचा रस
  • ३ चमचे कोर्नफ्लोर
  • १ चमचा टोमॅटो सॉस
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल

कृती

सर्वप्रथम एका पॅनमध्ये १ ते २ चमचे तेल घालून मध्यम आचेवर गरम होण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कांदा, आलं-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, काळी मिरीपूड आणि लिंबाचा रस घालून २ ते ३ मिनिटे परतून घ्या. नंतर या पॅनमध्ये कॉर्न, पनीर, सॉस आणि मीठ घालून चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. तयार मिश्रणाला थंड होऊ द्या. एका भांड्यात कोर्नफ्लोर, मीठ आणि पाणी मिसळून दाटसर घोळ तयार करा. कढईत तेल घालून मध्यम आचेवर गरम होण्यासाठी ठेवा. ब्रेडच्या कडा कापून या ब्रेडला लाटून घ्या. या स्लाइसमध्ये तयार केलेले मिश्रण १-२ चमचे भरून गोल गुंडाळी करा. या रोलला कोर्नफ्लोरच्या मिश्रणात बुडवून तेलात तळण्यासाठी टाका. ग्लोडन रंग येईपर्यंत तळून घ्या. हे रोल हिरवी चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -