पेरु मिल्क शेक

पेरु मिल्क शेक

थंडीच्या दिवसात पेरु मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होतात. तुम्ही जर सतत पेरु खाऊन कंटाळला असाल तर त्याजागी तुम्ही पेरु मिल्क शेक देखील बनवू शकता.

साहित्य

  • २ पेरुचे तुकडे
  • २ चमचे साखर
  • गरजेनुसार बर्फ
  • चवीनुसार काळे मीठ
  • दूध

कृती

सर्वप्रथम पेरुचे बारीक तुकडे करुन घ्यावे. त्यानंतर मिक्सरला पेरुचे तुकडे, साखर, गरजेनुसार बर्फ, दूध आणि चवीनुसार काळे मीठ एकत्र करुन घेणे. हे सर्व मिश्रण बारीक करुन घ्यावे. त्यानंतर हे बारीक केलेले मिश्रण गाळून घेऊन सर्व्ह करावे. अशाप्रकारे घरच्या घरी पेरु मिल्क शेक तयार.