घरलाईफस्टाईलखव्याचे झटपट गुलाबजाम

खव्याचे झटपट गुलाबजाम

Subscribe

खव्याचे गुलाबजाम

गुलाबजाम म्हटलं का कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. कारण बऱ्याचदा काही सणवार असेल किंवा घरगुती कार्यक्रम असो त्यावेळी आपण गुलाबजाम नक्की करतो. मात्र, हे गुलाबजाम घरच्या घरी कसे करायचे ते आपण पाहणार आहोत. चला तर पाहुया साहित्य आणि कृती.

साहित्य

- Advertisement -
  • २५० ग्रॅम खवा
  • ४ टेस्पून मैदा
  • २ टेस्पून रवा
  • साखर १ मोठी वाटी
  • पाणी १ मोठी वाटी
  • वेलची पूड
  • तेल/तूप तळणीसाठी
  • चिमूटभर खाण्याचा सोडा
  • रोज इसेन्स

कृती

सर्वप्रथम खवा मऊ असल्यास हातानेच मळून घ्यावा अथवा घट्ट असल्यास पुरण यंत्राभधून काढून घ्यावा. त्यामध्ये मैदा, रवा, वेलची पूड सोडा मिसळून चांगले मळून एकजीव करावे. गरज वाटल्यास थोडे दूध शिंपङावे. आता तयार मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या करून मंद आचेवर गुलाबी रंगावर तेलात तळून काढावे. नंतर एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये साखर आणि पाणी एकत्र करून पाक करून घ्यावा. साखर विरघळून एक उकळी आली की पाक झाला. आता गँस बंद करा आणि त्यामधे रोज इसेन्स घाला. त्यानंतर तळून घेतलेले गोळे त्या पाकात सोडा हे गुलाबजाम २-३ तास चांगले मुरण्यासाठी लागतात. अशाप्रकारे लुसलुशीत घरच्या घरी गुलाबजाम तयार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -