पावसाळ्यात अशी घ्या केसांची काळजी…

पावसात कामानिमित्त ट्रेनने प्रवास करताना केसांचे सौंदर्य बऱ्याचदा बिघडते.

Mumbai

वेगवेगळ्या ऋतू आणि हवामान बदलाचा आरोग्यासह केसांवर देखील परिणाम होतो. बदलत्या ऋतुमध्ये आरोग्य आणि केसांची काळजी घेण्याची पद्धत प्रत्येक तरूणीची बदलते. पावसात कामानिमित्त ट्रेनने प्रवास करताना केसांचे सौंदर्य बऱ्याचदा बिघडते. अशावेळी केसांचा पोत, सौंदर्य पावसाळ्यात कशाप्रकारे उत्तम राहिल, याकरिता काही टिप्स…

  • पावसाळा सुरू झाल्यास शक्यतो वेगवेगळ्या हेअर स्टाईल करणे टाळावे. जरी हेअर स्टाईल करायची असेल तर हेअर स्प्रे, हेअर जेलचा वापर पावसाळ्यात करणं टाळा.
  • पावसाळ्यात सतत होणाऱ्या वातावरण बदलामुळे केसांवर त्याचा विपरित परिणाम होतोच. या वातावरणातील ओलावा, आद्रतेमुळे केस तेलकट आणि चिकट होतात. त्यामुळे दोनवेळा तरी केस धुवावेत.
  • केस धुण्यासाठी सौम्य शॅम्प्यूचा वापर करा. आठवड्यातून दोन वेळा केस धुवून एकदा कंडिशनर लावावे.
  • पावसाळ्यातील प्रवासात केस भिजले असेल तर ते लगेच स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत.
  • पावसाळ्यात हेअर स्ट्रेटनिंग करणं तसेच सतत आयनिंग करणे टाळावे.
  • पावसाळ्यात केस ओले झाले असल्यास मोठ्या दातांचा कंगवा किंवा लाकडी कंगवा वापरा. त्यामुळे केस जास्त तुटणार नाही.
  • केसांना १५ मिनिटे लिंबाचा रस लावून केस धुतल्यास केसांचा तेलकटपणा तसेच केस चिकट होणार नाही.
  • केस भिजले असल्यास लगेच बांधू नये, यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here