घरलाईफस्टाईलआहाराच्या माध्यमातून केसांचे पोषण

आहाराच्या माध्यमातून केसांचे पोषण

Subscribe

केवळ चुकीच्या शाम्पूचा वापर आणि तणाव यामुळेच केस गळतात असे नाही. तज्ज्ञांच्या मते केस गळण्यासाठी अयोग्य पद्धतीने खाणे-पिणे हेसुद्धा एक मोठे कारण आहे. खाण्यापिण्याच्या माध्यमातून केसांचे कसे पोषण केले जाऊ शकते, त्याबाबत जाणून घेऊ.

* दूध, पनीर, चीज, दही आणि मठ्ठा अशा दुग्धजन्य पदार्थांचे भरपूर सेवन करावे. कारण यामुळे पोषक द्रव्यांची पूर्तता होते. साधारणपणे शरीरातील पोषक द्रव्यांच्या कमतरतेमुळेच केसांचे मूळ कमजोर होतात आणि केस गळायला लागतात.

* आंबट फळे आणि भाज्या जसे मोसंबी, संत्री, लिंबू, हिरवी मिरची, टोमॅटो यांचे भरपूर सेवन करावे. यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर असते. या जीवनसत्त्वाची दररोज 1000 ते 3000 मिलिग्रॅम एवढ्या प्रमाणात पूर्तता होणे आवश्यक आहे. तसेच आवळ्यामुळे केसांचे मूळ बळकट होतात. त्यामुळे आवळ्याचेही भरपूर सेवन करावे.

- Advertisement -

* लोह असलेल्या भाज्यांचे भरपूर सेवन करावे. कारण यामुळे डोक्याच्या त्वचेतील रक्तप्रवाह वाढण्यासोबतच केसांच्या मुळांनाही पोषण मिळते. त्यासाठी पालक, बीट, मनुका आणि अँप्रिकॉट्स यांचेही सेवन करावे.

* ‘अ’ जीवनसत्त्व असलेल्या खाद्यपदार्थांचे भरपूर सेवन केल्याने दाट केसांसाठी अत्यंत आवश्यक असणार्‍या हेअर फॉलिकल्सची संख्या वाढते. अंडी, गाजर यातून ते मिळते.

- Advertisement -

* अल्कोहोलचे सेवन करणे किंवा धूम्रपान यासारख्या वाईट सवयींपासून दूर राहावे. कारण यामुळेही केस अशक्त होऊन गळायला लागतात. तज्ज्ञांच्या मते धूम्रपान केल्यास केसांच्या मुळांना होणारा रक्तप्रवाह मंद होतो परिणामी केसांचा विकास खुंटतो.

* केसांचे पोषण करण्यासाठी ‘ई’ जीवनसत्त्व अत्यंत आवश्यक आहे. तसेच ‘ब’ जीवनसत्त्वही केसांसाठी फायदेशीर मानले जाते. याच्या सप्लिमेंट्सचे सेवन केल्यास केसांचे पोषण होण्यास आणि केस दाट होण्यास मदत होते.

* भरपूर पाणी प्यायल्यासही केसांच्या मुळांना बळकटी मिळते. यामुळे शरीर सजल राहते आणि केसांचा विकासही होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -