हँड ड्रायरखाली हात सुकवणं घातक

Mumbai
hand dryer is dangerous to health
हँड ड्रायरखाली हात सुकवणं घातक

या विज्ञान तंत्रज्ञान युगात आपल्या दरदरोजच्या वापरासाठी कधी कोणती इलेक्ट्रीक वस्तू येईल हे कळणं फारच अवघड आहे. सध्या हॉटेल किंवा थिएटरमध्ये अशा अनेक ठिकाणी हात सुकवण्यासाठी एक नवीन तंत्र आलं आहे. या तंत्राला हँड ड्रायर असं संबोधल जातं. आपण हँड ड्रायरचा वापर ओले हात कोरडे करण्यासाठी करतो. पण हे हँड ड्राय हात सुकवण्यासाठी धोकादायक आहे.

टॉयलेटमध्ये हँड ड्रायर खाली हात सुकवल्यास हात आणि शरीरावर बॅक्टेरिया चिकटण्याची शक्यता जास्त असते. हँड ड्रायरचा वापर हा विमानतळ, रेस्टॉरंट, कॉर्पोरेट ऑफिस किंवा शहरातील काही टॉयलेटमध्ये हात सुकवण्यासाठी जास्तप्रमाणात वापर केला जातो. हँड ड्रायरखाली काही सेकंदात ओले हात सुकतात. यामुळे हात लगेच कोरडे होतात. या पद्धतीने ओले हात सुकवणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. हँड ड्रायरखाली हात सुकवल्याने आपल्या स्वच्छ हातावर पुन्हा जंतू किंवा बॅक्टेरिया बसण्याची शक्यता असते. ड्रायरच्या वापरामुळे हवेतील ‘बॅक्टेरियल पॉथजीन्स स्पोअर्स’ धारांमध्ये शिरू शकतात. ज्यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.

संशोधकांनी एक प्लेट ३० सेकंद हँड ड्रायरखाली धरली. या प्लेटवर १८ ते ६० विविध बॅक्टेरिया जमा झालेले दिसले. पण हँड ड्रायरच्या आतील बाजूस मात्र कमी प्रमाणात बॅक्टेरिया होते. हँड ड्रायर बंद करूनही प्लेट दोन मिनिटे धरली. त्या प्लेटवर कमी प्रमाणात बॅक्टेरिया आढळून आले. ही प्लेट पुन्हा टॉयलेटमध्ये फॅन सुरू ठेवून २० मिनिटे धरण्यात आली. या प्लेटवर १५ बॅक्टेरिया सापडले. मात्र या मशिनशिवाय आपण टॉवेल किंवा टिशू वापरु शकतो आणि या मशिनचा वापर टाळू शकतो, असा सल्ला तज्ञांनी दिलाय.

टॉयलेटमध्ये असणाऱ्या हवेत फ्लोटिंग बॅक्टेरिया असतात. त्यापैकी आपण हँड ड्रायरचा वापर करतो, त्यावेळी ते बॅक्टेरिया हातावर चिकटण्याची शक्यता असते. या बॅक्टेरियामुळे अनेक आजारही होऊ शकतात, असं सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मधुकर गायकवाड यांनी सांगितलं.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here