घरलाईफस्टाईलहाताने जेवण्याचे फायदे

हाताने जेवण्याचे फायदे

Subscribe

भारतीय आपल्या हाताने जेवण करतात. परंतु आजकाल आपण पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून चमचा किंवा काटा चमच्याने खाणे सुरू केले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, की हाताने जेवण केल्याचे किती फायदे आहेत. यामुळे तुमची अतिरिक्त ऊर्जा शिल्लक राहते.

आयुर्वेदात म्हटले आहे की, आपण पंचतत्त्वांनी बनलो आहोत. ज्याला जीवन ऊर्जा देखील म्हटले जाते. ही पाच तत्त्वे आपल्या हातात असतात. आपला अंगठा अग्निचे प्रतीक आहे, तर्जनी म्हणजे अंगठ्याच्या बाजूचे बोट हवेचे प्रतिक आहे. मध्यमा बोट आकाशाचे प्रतिक, अनामिका बोट पृथ्वीचे आणि सर्वात लहान बोट हे पाण्याचे प्रतिक आहे. यामधील एकाही तत्त्वाचे असंतुलन आजाराचे कारण होऊ शकते.

जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा आपण सर्व बोटे एकत्र करून जेवण करतो. विज्ञानात सांगितले आहे की, ही मुद्रा शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करते. यामुळेच आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा या सर्व तत्त्वांना एकत्र करतो. यामुळे भोजन ऊर्जादायक होते.

- Advertisement -

यामुळे पचनक्रिया सुधारते

स्पर्श आपल्या शरीराचा सर्वात मजबूत आणि नियमित वापरण्यात येणारा अनुभव असतो. जेव्हा आपण आपल्या हाताने जेवण करतो तेव्हा आपले मस्तिष्क आपल्या पोटाला संदेश देतो की, आपण जेवण करणार आहोत. यामुळे आपले पोट जेवण करण्यासाठी तयार होते आणि पचनक्रिया सुधारते.

माइंडफुल ईटिंग

हाताने जेवण करताना आपल्याला जेवणावर लक्ष द्यावे लागते. यामध्ये आपल्याला जेवणाला पाहावे लागते, जे आपल्या तोंडात जात आहे त्याकडे पाहावे लागते. याला माइंडफुल ईटिंग म्हटले जाते. हे चमच्याने जेवण करण्यापेक्षा जास्त आरोग्यदायी असते. माइंडफुल ईटिंगचे अनेक फायदे आहेत. यामधील सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे यामुळे जेवणातील पोषकतत्त्व वाढतात. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि आरोग्य चांगले राहते.

- Advertisement -

 त्वचेची संवेदनशीलता

आपले हात तापमान संवेदकाचे काम करतात. जेव्हा तुम्ही हाताने जेवण करता तेव्हा तुम्हाला कळते की, अन्न किती गरम आहे. जास्त गरम असल्यास आपण तोंडात घेत नाही. परंतु, चमच्याने आपण तसेच खातो यामुळे जीभ जळण्याची शक्यता असते. हाताने खाल्ल्यावर असे होत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -