जीवनात आनंदी राहण्यासाठी ‘या’ गोष्टी करणे गरजेच

Mumbai

निसर्गाने आपल्याला जीवन ही एक अमुल्य अशी गोष्ट दिली आहे. हे जीवन कसं जगायचं हे आपल्यावर अवलंबून असतं. जीवनात मनसोक्त आनंदाने जगायच हा आपला हक्क आहे. त्यामुळे आज आपण महिलांनी आनंदी कसं राहवं या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.

महिला जरी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे गेल्या असल्या तरी देखील कितीतरी महिलांच्या जीवनात नैराश्याे घर झालं आहे. या नैराश्याच्या आहारी जाऊ कितीतरी महिला आत्महत्या करतात. जगात आजही अनेक जणी चिंता काळजी करतं जगत आहेत. जर तुमचे मन प्रसन्न राहिले नाहीतर तर तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे जीवन हे आनंदात जगणं हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण तुमच्या खांद्यावर तुमच्या घराची जबाबदारी असते. म्हणून अजूनही वेळ गेली नाही हे सांगण्यासाठी तुम्हाला ही माहिती देत आहोत.

१) नाही बोलायला शिका

आपण इतरांचा विचार जास्त करतं असल्यामुळे त्यांना खूश करण्याच्या नादात कधीकधी तुम्ही स्वतःवर अन्याय करत असता. कोणाला नाही म्हणता येत नाही म्हणून इतरांना हवं तसं वागायला देतात. मात्र तुमच्या या स्वभावामुळे नकळत तुम्हीच दुःखी आणि निराश होता. म्हणून त्यावेळी नाही म्हणायला शिका ज्यामुळे तुम्हाला त्याचा नंतर त्रास होणार नाही.

२) संवाद करताना नम्र आणि शांतपणे करा

नम्र आणि विनयशील राहून स्वतःचा सन्मान वाढवा. कारण लोक तुम्हाला तुमच्या वागण्या बोलण्यावरुन वर्तणूक कशी आहे हे ठरवतात आणि त्याच पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद देतात. त्यामुळे आरडा-ओरडा करून मन निराश करू नका. जेव्हा जीवनात मतभेद नसतात तेव्हा तुम्ही नक्कीच आनंदी असता.

३) स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या

आजकाल धावत्या जीवनात आपलं आरोग्याकडे लक्ष दुर्लक्षित होत असतं. महिला आरोग्य विषय आला की प्रथम प्राध्यान आपल्या कुटुंबालाच देतात. आई-वडील, नवरा, मुलं, आणि सासु-सासरे यांची काळजी घेण्याच्या नादात आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. पण हे चुकीचं आहे. जर तुम्ही निरोगी आणि प्रसन्न असाल तर तुम्ही तुमच्या कुटुंबियांची काळजी घेऊ शकता. त्यामुळे नियमित पणे मेडीटेशन, व्यायाम, योगासने करण्यासाठी वेळ द्या. वर्षातून एकदा तरी आरोग्य तपासणी करणे गरजेच आहे. जर तुम्ही निरोगी असाल तर तुमचे मन आनंदी राहील.

४) चांगल्या-वाईट गोष्टींना ओळखा

महिला खूप हळव्या असतात. त्या प्रत्येक गोष्टीकडे भावनिक दृष्टीकोनातून पाहत असतात. त्यामुळे असं न राहता तटस्थपणे सगळ्या गोष्टीकडे पाहायला शिका. ज्यामुळे तुम्हाला चांगल्या-वाईट गोष्टी कळतील. कोणताही निर्णय घेताना भावनिक होऊ नका. भावनिक होऊ घेतलेले निर्णय हे महागात पडतात. तसेच कोणत्याही गोष्टीचा नीट तपास करून मग निर्णय घ्या. या गोष्टी केल्यामुळे तुम्ही भविष्यात आनंदी राहू शकाल.

५) स्वतःच्या संरक्षणाचे प्रशिक्षण घ्या

दिवसेंदिवस महिलांवर होण्याऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या संरक्षणासाठी प्रशिक्षण घेणं गरजेच आहे. यासाठी तुम्ही एखाद्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हा. त्यामुळे तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात तुम्ही वाचा फोडू शकाल. आत्मविश्वासामुळे तुम्ही नेहमी आनंदी राहालं.

या गोष्टी तुम्ही नक्की करा. तुम्हाला जीवनात काहीतरी वेगळा बदल झालेला दिसून येईल.