‘Valentine डे’ : तुमच्यासाठी खास गिफ्ट आयडिया

प्रियकर - प्रियसीकरता खास गिफ्ट आयडीया

'Valentine डे' : तुमच्यासाठी खास गिफ्ट आयडिया

‘Valentine डे’ म्हणजे प्रेमाचा दिवस. हा दिवस आपल्या प्रिय व्यक्तीसोबत साजरा केला जातो. या दिवशी अनेक प्रियकर – प्रियसी, नवरा – बायको हा एकमेकांना गिफ्ट देतात. मात्र, बऱ्याचदा काय गिफ्ट द्यावे, असा प्रश्न अनेकांना पडतो. परंतु काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला खास गिफ्टसच्या आयडिया देणार आहोत. तसेच, बाजारात किंवा अगदी कमी किंमतीत आपल्याला एकापेक्षा जास्त ‘Valentine डे’ गिफ्ट सहज उपलब्ध होतील.

प्रियकरासाठी खास गिफ्ट

गिफ्ट हॅम्पर्स

मार्केटमध्ये आपल्या प्रियकरासाठी बरेच चांगले गिफ्ट हॅम्पर्स आले आहेत. या गिफ्ट हॅम्पर्समध्ये परफ्यूम, रिंग चेन, पेन आणि वॉलेट यांचा समावेश आहे.

घड्याळ

गिफ्ट म्हणून घड्याळ हा उत्तम असा पर्याय आहे. आजकाल बर्‍याच ठिकाणी ऑनलाईन सेल देखील सुरु असून तुम्हाला सर्वात महागडी घड्याळ देखील गिफ्ट म्हणून देता येतील.

गिफ्ट व्हाउचर

आपल्या जोडीदारासह रोमँटिक डिनरला जा आणि नंतर तेथे त्याला गिफ्ट व्हाउचर द्या. या गिफ्ट व्हाउचरवर कपड्यांच्या ब्रँडपासून इलेक्ट्रॉनिक वस्तूपर्यंत तुम्ही खरेदी करु शकता.

प्रियसीकरता खास गिफ्ट

नेकलेस

तुम्ही तुमच्या प्रियसीला सुंदर असा नेकलेस देऊ शकता. ज्या नेकलेसमध्ये तुमच्या नावाचे पहिले अक्षर असेल किंवा तुमचे नाव असेल. हे गिफ्ट तुमच्या जोडीदाराला नक्की आवडेल.

मेकअपचे सामान

बऱ्याच मुली मेकअप आणि स्किन केअर वस्तूंवर भरपूर पैसे खर्च करतात. सर्वच मुलींना त्यांच्या त्वचेची काळजी घ्यायलाही तितकीच आवडते. त्यामुळे यंदाच्या ‘Valentine डे’ला तुम्ही Branded मेकअपच्या वस्तू देऊ शकता.

प्रेमाचे पुस्तक

बऱ्याच जणांना पुस्तक वाचण्याची आवड असते. त्याप्रमाणे त्यांची आवड लक्षात घेऊन त्यांना खास असे प्रेमाचे पुस्तक गिफ्ट म्हणून देऊ शकता.