‘आलुबुखारा’चे आरोग्यदायी फायदे

जाणून घ्या 'आलुबुखारा'चे आरोग्यदायी फायदे

Mumbai
health benefits of aalu bukhara
'आलुबुखारा'चे आरोग्यदायी फायदे

आलुबुखार या फळामध्ये मोठ्या प्रमाणात मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे प्रमाण असते. यामुळे याचे सेवन करणे आरोग्यास फायदेशीर ठरते. या फळाची चव जरी आंबट गोड असली तरी देखील यामध्ये डायट्री फायबर आणि आयसेटिनव्यतिरिक्त अँटी ऑक्सिडंट देखील मुबलक प्रमाणात असतात.

वजन कमी करण्यास मदत

आलुबुखारमध्ये इतर फळांपेक्षा कमी प्रमाणात कॅलरी असते. त्यामुळे या फळाचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते.

डोळ्यांसाठी फायदेशीर

व्हिटॅमिन – के, सी आणि बी ६ मुबलक प्रमाणात असलेले आलुबुखारचे सेवन केल्यामुळे हे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते.

रोगप्रतिकार शक्ती वाढते

आलुबुखारचे सेवन केल्यामुळे शरीरात मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

कॅन्सर रोखण्यासाठी मदत

आलुबुखाराची साल ब्रेस्ट कॅन्सर रोखण्यासाठी मदत करते. त्याचप्रमाणे कॅन्सर आणि ट्यूमरचे सेल्स वाढविण्यापासून रोखतात.

हाडे मजबुत होण्यास मदत

महिलांच्या मासिक पाळीनंतर बऱ्याचदा महिलांची हाडे ठिसूळ होतात. त्यामुळे महिलांनी आलुबुखारचे सेवन करणे आवश्यक आहे. यामुळे ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो.

रक्तदाब नियंत्रित राहतो

आलुबुखार खाल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच हृदयसंबंधातील आजार होण्याचा धोका कमी होतो.

कोलेस्ट्रोल कमी होते

आलुबुखारमध्ये आयर्न इम्यूनिटी सिस्टम मजबुत करण्यासाठी मदत करते. त्यामुळे आलुबुखारच्या सेवनाने बॅड कोलेस्ट्रोल कमी होते. त्याचबरोबर पोटॅशिअम शरिरातील पेशी स्ट्रॉन्ग करते आणि ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये ठेवते.

तणाव कमी होतो

आलुबुखारमध्ये असलेले अँनीऑक्सिडंट त्वेचेसोबत मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर तणाव देखील कमी होतो.