घरलाईफस्टाईलहिवाळ्यातील गुणकारी आवळा

हिवाळ्यातील गुणकारी आवळा

Subscribe

जाणून घ्या आवळ्याचे लाभदायी फायदे...

दरवर्षी थंडीमध्ये बाजारात आवळे येण्यास सुरुवात होते. हे आवळे पाहताच क्षणी अनेकांच्या तोंडाला पाणी देखील सुटते. मात्र, आवळ्याला फक्त फळ म्हणून न पाहता औषध म्हणून पाहण्याची गरज असते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, आर्यन, मॅग्नेशियम, फायबर यांसारखे अनेक जीवनसत्त्व असतात. त्यामुळे आवळ्याचे सेवन करणे केव्हाही उपयुक्त ठरते. आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे याकरिता आवळ्याचे सेवन केल्याने हिताचे ठरु शकते. चला तर जाणून घेऊया आवळ्याचे इतरही फायदे

वजन कमी होते

- Advertisement -

वजन कमी करणे आवळा तुमच्या शरीरातील मेंटबॉलिज्म मजबूत करतो. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते.

पचनक्रिया

- Advertisement -

अनेकाना अपचनाचा त्रास असतो. अशा व्यक्तींनी आवळ्याचे सेवन करावे. अन्न पचवण्यासाठी आवळा फायद्याचा ठरतो. गॅस, अॅसिडिटी, आंबट ढेकर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी आवळा लाभदायी ठरतो. त्यामुळे आवळ्याचा वापर तुमच्या रोजच्या जेवण्यात करावा.

हृदय तंदुरुस्त

आवळ्यामध्ये असणारी औषधी गुणधर्म बीटा ब्लॉकरच्या प्रभावाला कमी करतात. यामुळे तुमचे हृय तंदुरुस्त राहते.

मधुमेह

मधुमेहाच्या समस्येवर आवळा गुणकारी आहे. आवळ्यामध्ये क्रोमियम तत्व मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिन पेशी मजबूत होऊन शरीरातील साखरेचे प्रमाणावर नियंत्रण ठेवता येते.

मासिक पाळीची समस्या

अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान, पोटदुखी, कंबरदुखी, अनियमितता अशा त्रासाला सामोरे जावे लागते. अशावेळी आवळ्याचे सेवन करावे. आवळ्यामध्ये असणारे व्हिटॅमिन्स आणि मिनरल असतात. त्यामुळे आवळ्याचे सेवन केल्यास त्याचा फायदा होतो.

हाडे मजबूत होतात

आवळ्याचे सेवन केल्याने तुमची हाडे मजबूत होतात. आवळ्यात मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम असते. यामुळे ऑस्ट्रोपोरोसिस, अर्थराईटीस सारखी दुखणी दूर होतात.

रोगप्रतिकार शक्ती

आवळ्यात लोह आणि क जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे, रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे आवळ्याचे सेवन करावे.

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -