घरलाईफस्टाईलसर्दी - खोकल्यासह इतरही समस्यांवर 'काळी मिरी' लाभदायक

सर्दी – खोकल्यासह इतरही समस्यांवर ‘काळी मिरी’ लाभदायक

Subscribe

काळ्या मिरीचे आरोग्यदायी फायदे.

स्वयंपाक घरातील छोटे-छोटे घटक देखील खूप मोठी कमागिरी करतात. त्यातील मिरी हा एक महत्त्वाचा घटक आहे. मसाले आणि जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी काळी मिरीचा वापर केला जातो. मात्र, ही मिरी केवळ चवच नाही तर इतर ओरोग्यासाठी ही महत्त्वाची आहे.

अपचनाची समस्या

- Advertisement -

अपचन, जुलाब, तसेच बद्धकोष्ठता अशा समस्या उद्भवल्यास काळ्या मिरीचे सेवन करावे. यामुळे पचनशक्ती वाढते. काळ्या मिरीच्या सेवनाने पोट फुगणे, अपचन, जुलाब, बद्धकोष्ठता दूर होते. यासाठी ताकमध्ये थोडी काळी मिरी पावडर आणि काळे मीठ घालून दुपारी जेवणानंतर सेवन करावी.

वजन कमी करण्यासाठी

- Advertisement -

काळी मिरी नियमितपणे सेवन केल्यास वजनावर नियंत्रण ठेवता येते. त्यातील फायटोन्यूट्रियंटस्मुळे चरबीचा बाह्य थर मोडण्यास मदत होते. त्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही. या प्रक्रियेत शरीराला अधिक घाम येतो. सारखे लघवी ला जावे लागते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जाऊन वजन कमी होते.

सर्दी आणि खोकला

सर्दी, कफ आणि नाक चोंदणे या त्रासात काळ्या मिरीने आराम मिळतो. खोकला कमी होण्यास मदत होते. सर्दीमुळे नाक वाहत असल्यास काळ्या मिरीचे सेवन केल्याने आराम पडतो. कफ, छातीतील कफ यावरही मिरीचा फायदा होतो. अतिसर्दी झाल्यास काळी मिरी आणि लसूण एकत्र करून खावा. तसेच गरम दुधाबरोबर काळी मिरी घेतल्यास फायदा होतो.

त्वचा चमकते

काळ्या मिरीचा चेहर्‍याला स्क्रब म्हणून वापर केल्यास, त्वचा चमकते आणि या स्क्रबमुळे त्वचेवरील मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. तसेच त्वचेचे पोषणही होते. त्याचबरोबर रक्ताभिसरणही नियमित होते, ज्यामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.

पोटातला वायू

पोटात वायू झाला असेल, तर काळी मिरी त्यावर इलाज आहे. काळ्या मिरीत वातहर गुण असतात. त्यामुळे काळ्या मिरीचे सेवन केल्याने पोटात वायू साठून राहू शकत नाही, तो सहजपणे सुटा होतो. त्याशिवाय पोट फुगले असल्यास किंवा पोट दुखत असल्यास काळ्या मिरीचे सेवन केल्याने आराम मिळतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -