मक्याचे सेवन करणे फायदेशीर

मका हा अत्यंत पौष्टिक असून त्यामध्ये फायबर्सचे प्रमाण अधिक असल्याने मक्याचे अधिक फायदे जाणून घेऊ

Mumbai

पावसाळा आला की, सर्वच जण आवर्जून मक्याचे कणीस खात असतात. मक्याच्या कणसाला भुट्टा, कॉर्न अशी विविध भाषेतील नावे आहेत.मक्का धान्यवर्गीय आहे. त्यात तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्व, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. पिवळ्या रंगाचा मका सर्वांनी पाहिला असेल आणि खाल्लाही असेल; पण जगभरात मक्याच्या अनेक विविध जाती आहेत. लाल, नारंगी, वांगी, निळा, पांढरा आदी रंगांचा मका मिळतो आणि अगदी काळ्या रंगाचा मका देखील मिळतो.

मक्याचे कणीस खाण्यास चविष्ट लागते. कारण त्याला वेगळी चव असते. त्याच्या सेवनाने अनेक समस्या दूर होतात. तसेच मका हा अत्यंत पौष्टिक असून त्यामध्ये फायबर्सचे प्रमाण अधिक असल्याने मक्याचे अधिक फायदे जाणून घेऊ…

वजन कमी करण्यास उपयुक्त

वजन कमी असेल आणि ते वाढवायचे असेल तर कसे वाढवावे याची चिंता करू नका. थोडे वजन वाढवण्यासाठी मक्याचा आहारात समावेश जरूर करावा. जंक फूड आणि चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने अनेक आरोग्य समस्या भेडसावतात, ज्या दीर्घकाळ त्रासदायक ठरतात. मक्यातून मात्र चांगल्या कॅलरीज मिळतात. त्यातून जीवनसत्त्व आणि चांगले सुपाच्य तंतुमय पदार्थही मिळतात.

हृदयाच्या आरोग्यासाठी मका फायदेशीर

मक्यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी होतात. मक्यात असलेल्या बायोफ्लेवोनॉयड्स, कॅरोटेनॉयइस, विटॉमिन्स आणि फायबर्स असतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी मका फायदेशीर ठरतो.

लाल रक्तपेशींचे उत्पादन होण्यास उपयुक्त

मक्यामध्ये बी१२ जीवनसत्त्व, फोलिक अ‍ॅसिड आणि लोह भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे लाल रक्तपेशींचे उत्पादन होण्यास मदत होते. लाल रक्तपेशींच्या उत्पादनासाठी आवश्यक पोषक घटकांचा पुरवठा मक्याच्या सेवनाने होते. पोषण तज्ज्ञांनुसार १ कप कच्च्या मक्यामध्ये १२५ कॅलरी, २७ ग्रॅम कार्बोहायड्रेट, ४ ग्रॅम प्रथिने, ९ ग्रॅम साखर, २ ग्रॅम चरबी आणि ७५ मिलिग्रॅम लोह असते.

शरीराला ऊर्जा मिळते

मक्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. जर तुम्हाला दमल्यासारखे वाटत असेल तर किंवा काम करताना आळस येत असेल तर आहारात मक्याचा समावेश करा. त्यामुळे पोट लवकर भरते आणि उत्साह टिकून राहतो. मका तुमच्या डोळ्यांसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. कारण त्यात व्हिटॉमिन ए आणि बीटा कॅरेटीन असते. त्यामुळे तुमची दृष्टी सुधारते.