घरलाईफस्टाईलअनेक रोगांवर गुणकारी टोमॅटो

अनेक रोगांवर गुणकारी टोमॅटो

Subscribe

इंग्लंडमधील डॉक्टर, आरोग्यतज्ञ टोमॅटोकडे कॅन्सरवरचे प्रभावी औषध म्हणून पाहतात. टोमॅटो कॅन्सरवर गुणकारी आहेच, पण नव्या संशोधनानुसार तो हृदयरोग आणि फिट्स यावरही गुणकारी आहे, असे तज्ञांनी स्पष्ट केले आहे.

इंग्लंडमधील डॉक्टर, आरोग्यतज्ञ टोमॅटोकडे कॅन्सरवरचे प्रभावी औषध म्हणून पाहतात. टोमॅटो कॅन्सरवर गुणकारी आहेच, पण नव्या संशोधनानुसार तो हृदयरोग आणि फिट्स यावरही गुणकारी आहे, असे तज्ञांनी स्पष्ट केले आहे. वैज्ञानिकांच्या मते, टोमॅटोमध्ये लायकोपेन नावाचं एक औषधी तत्व आहे. ज्याच्यामुळे टोमॅटो लाल दिसतो. लायकोपेन कॅन्सरवरचं औषध म्हणून सिद्ध झालं आहे. हेच लायकोपेन तत्व रक्तातील गुठळ्या नष्ट करतं. त्यामुळे ते हृदयासाठी उपयुक्त आहे. हे लायकोपेन टोमॅटोच्या बियांभोवती चिकट द्रव स्वरुपात असतं. ते पिवळसर पारदर्शक असते.

दरवर्षी जगात ५० हजार व्यक्ती रक्ताच्या गुठळ्या रक्तवाहिन्यात साचल्याने आणि त्यामुळे हृदयात बिघाड होऊन मृत्यू पावतात. धूम्रपान, दीर्घकाळ अ‍ॅलोपॅथिक औषधांचं सेवन, सतत एका जागी बसून राहणारे, नेहमी विमान प्रवास करणारे, आजारपणामुळे अंथरुणावर बराच काळ झोपणारे हे सर्वजण रक्ताच्या गुठळ्यांनी विकारग्रस्त होतात. लायकोपेन प्लेटलेट गुठळ्या बनण्यास प्रतिबंध करते. हृदयविकारात लायकोपेन ७० टक्के गुणकारी ठरले आहे. ठणठणीत राहायचे असेल तर, नेहमी टोमॅटो सूप घ्या. म्हणजे हृदयविकार होणार नाही असा सल्ला इंग्लंडचे वैज्ञानिक देतात. त्यांनी काही रुग्णांना वरचेवर टोमॅटो सूप पाजून त्यांची शारीरिक तपासणी केली. तेव्हा त्यांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या आढळल्या नाहीत. तसंच फिट्सवरही लायकोपेन प्रभावी औषध ठरले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -