घरलाईफस्टाईलमटार खाण्याचे आरोग्यदायी फायदे

मटार खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Subscribe

हिवाळ्याच्या दिवसात हिरवागार मटार बाजारात दाखल होतो. हा मटार खाण्यासाठी जितका चविष्ट, चवदार लागतो तितकाच तो आरोग्यादायी आहे. कारण मटारमध्ये बरीच पोषक द्रव्ये असतात. तसेच मटारमध्ये व्हिटामिन ए, बी१, बी६, सी आणि के आढळतात. म्हणूनच मटारला व्हिटामिन आणि ऊर्जेचा उत्तम स्त्रोत म्हटले जाते.

वजन होते कमी

वाटाणा वजन कमी करण्यासाठीचा सर्वोत्तम आहार मानला जातो. कारण मटारमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते. विशेष म्हणजे मटारमध्ये कॅलरी आणि फॅटही कमी असतात, यामुळे वजन कमी होते.

- Advertisement -

हाडे होतात मजबूत

मटारमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ‘के’ आढळते. हे व्हिटॅमिन ‘के’ हाडांना मजबूत करतात. तसेच व्हिटामिन के ऑस्टिओपोरोसिसच्या समस्येपासून शरीराचे रक्षण करते. यामुळे हाडे मजबूत होतात.

त्वचेसाठी गुणकारी

मटारमध्ये आढळणारा व्हिटामिन सी कोलेजनच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतो. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार बनते.

- Advertisement -

पचनासाठी फायदेशीर

पचनासाठी मटार एक उत्तम भाजी असून शरीरातील चांगले बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते. ज्यामुळे आतडे योग्य प्रकारे कार्य करते. तसेच मटार खाल्ल्याने पोट व्यवस्थित साफ होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

रोगप्रतिकार शक्ती वाढते

हिरव्या मटारमध्ये लोह, झिंक, मॅगनीच, कॉपर ही पोषक तत्वे असतात. त्यामुळे शरीराचा वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी पोषक तत्वे फायदेशीर ठरतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -