घरलाईफस्टाईलसुंदर त्वचेसह 'हे' आहेत गुलकंद खाण्याचे फायदे

सुंदर त्वचेसह ‘हे’ आहेत गुलकंद खाण्याचे फायदे

Subscribe

जाणून घ्या गुलकंद खाण्याचे फायदे

‘गुलकंद’ हा असा पदार्थ आहे की, त्याचे सेवन केल्याने आरोग्यासाठी चांगला फायदा होता. गुलकंदामध्ये व्हिटामिन सी, ई आणि बी भरपूर प्रमाणात असते. याच्या सेवनाने शरीर थंड राहते. यासह अजून कोणते फायदे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत.

सुंदर त्वचा

गुलकंदामध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेला त्याचे अनेक फायदे होतात. गुलकंदाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील डाग, मुरुम, फोड दूर होतात. तसेत त्वचेला मुलायमपणा मिळतो. त्वचा तजेलदार आणि चमकदार बनते.

- Advertisement -

डोळ्यांसाठी फायदेशीर

डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी गुलकंद खाणे फायदेशीर आहे. गुलकंदाचा गुणधर्म हा शीत असतो. त्यामुळे शरीराला थंडावा तर मिळतोच. परंतु, डोळ्यांनादेखील याचा फायदा होतो. डोळ्यांची सूज आणि डोळे लाल होणे यावर गुलकंद हा प्रभावी इलाज ठरू शकतो.

तोंड येणे किंवा तोंडात छाले होणे

बऱ्याचदा अनेकांना तोंड येणे किंवा तोंडात छाले होणे, अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे अन्नसेवन करताना किंवा तिखट पदार्थ खाताना तोंडाची प्रचंड आग होते. क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे तोंडात छाले होतात, असे सांगितले जाते. गुलकंदात क जीवनसत्व आढळत असल्यामुळे याचे सेवन केल्यास हा त्रास दूर होऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -