Saturday, August 8, 2020
Mumbai
28.6 C
घर लाईफस्टाईल जाणून घ्या मक्याचे कणीस खाण्याचे फायदे

जाणून घ्या मक्याचे कणीस खाण्याचे फायदे

मक्याचे सेवन करण्याचे फायदे

Mumbai
health benefits of maize
मक्याचे सेवन करण्याचे फायदे

पावसाळा आणि मक्याचे कणीस एक वेगळेच समीकरण आहे. पावसाळा सुरु झाला की, बाजारात मक्याच्या कणसाचा खमंग सुटतो. विशेष म्हणजे मका हा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच तोंडाला पाणी आणारा पदार्थ आहे. तसेच या पदार्थाचे आरोग्यदायी फायदेही आहेत. चला तर जाणून घेऊया मक्याचे कणीस खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

हाडांना बळकटी

मका हा हाडांना बळकटी देतो. मक्यामध्ये आर्यन, मॅग्नेशियम ही तत्वे हाडांना मजबूत करतात. तसेच यात झिंक आणि फॉस्फरस देखील असते. हे आपल्या हाडांच्या आजारांपासून आपला बचाव करतात.

पित्त विकार नियंत्रणात येतो

बऱ्याच जणांना पित्ताचा आणि वाताचा त्रास असतो, अशा व्यक्तींनी मक्याचे कणीस उकडताना त्यात चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ घालून उकडून खावे. यामुळे वात आणि पित्त विकार नियंत्रणात येतो.

शरीराला उत्साह मिळतो

काम करताना अनेकांना आळस येतो, अशावेळी मक्याचे सेवन केल्यास आळस दूर होण्यास मदत होते. त्याचसोबत शरीराला नवा उत्साह मिळतो.

सर्दी कमी होते

अनेकांना पावसात सर्दीचा त्रास जाणवू लागतो अशावेळी मक्याचे दोन तुकडे करुन त्याचा सुगंध घेतल्यास सर्दी देखील कमी होते.

रक्ताची कमतरता भरुन निघते

हिमोग्लोबिन अथवा शरीरात रक्ताची कमतरता असेल तर उकडलेले मक्याचे कणीस फायदेशीर ठरते. त्यामुळे जर दर महिन्यात किमान एकदा तरी कणीस उकडून खाल्ले पाहिजे. याने पोटही मजबूत होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here