शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

थंडीच्या दिवसात शेंगदाणे खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असते. चला तर जाणून घेऊया शेंगदाणे खाण्याचे फायदे

Mumbai
health benefits of nuts
शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

अनेकदा टीव्ही पाहताना उत्तम टाईमपास म्हणून शेंगदाणे खाल्ले जातात. तसेच थंडीच्या दिवसात शेंगदाणे खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असते. शेंगदाण्यामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन असतात. त्यामुळे शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. 

  • शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्य़ास मदत होते. त्यामुळे ज्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉल आहे अशा व्यक्तीने दररोज शेंगदाणे खावे.
  • शेंगदाण्यांमध्ये व्हिटॅमिन इ मोठ्या प्रमाणात असल्याने शेंगदाणा उपयुक्त अँटीऑक्सिडंटचा मोठा स्त्रोत आहे. यामुळे हृदयाचे आजार दूर होण्यास मदत होते.
  • गर्भवती स्त्रियांनी दररोज शेंगदाणे खाल्ल्याने बाळाच्या विकास चांगला होता. यामुळे दररोद गर्भवती स्त्रीने एक मूठभर शेंगदाणे खावे.
  • शेंगदाण्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास पचनशक्ती वाढते आणि भूक न लागण्याची समस्याही दूर होते.
  • शेंगदाण्यामध्ये ओमेगा – ६ फॅटसुद्धा भरपूर प्रमाणात असते. यामुळे चांगल्या त्वचेसाठी ते अत्यंत फायदेशीर आहे.
  • स्मरणशक्ती वाढण्यास शेंगदाणे एक उत्तम उपाय आहे.
  • शेंगदाणे खाल्ल्यास पित्ताचा त्रास दूर होतो.
  • शेंगदाण्यामध्ये तेल असल्यामुळे पोटाचे आजार नष्ट करतात.
  • शेंगदाण्याच्या नियमित सेवनाने गॅस आणि अॅसिडिटीपासून आराम मिळतो.
  • दररोज थोडेसे शेंगदाणे खाल्ल्यास महिला आणि पुरुषांमधील हार्मोन्सचे संतुलन कायम राहण्यास मदत होते.